विवाहपूर्व एचआयव्ही तपासणी करणे गरजेचे
-डॉ. टी. जी. धोटे
यवतमाळ 15 : यवतमाळ जिल्हा एचआयव्हीबाबत संवेदनशील असून जिल्ह्यातील प्रत्येकाने विवाहपूर्व एचआयव्ही तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. टी. जी. धोटे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील तीस ते चाळीस या वयोगटामध्ये एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. यामुळे भविष्यातील तरूण पिढीवर याचा परिणाम होऊ नये यासाठी स्वयंस्फूर्त तपासणी करून घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यामधील पालकांकडून नवजात बालकाला एचआयव्ही होण्याचे प्रमाण 71 एवढे असुन तरुण वर्गही एचआयव्ही आजाराला बळी पडला आहे. तसेच गृहिणींमध्येही एचआयव्हीचे प्रमाण अधिक प्रमाणात आढळून येत आहे. या आजाराच्या संक्रमणाला समाजातील नागरीक बळी पडू नये, यासाठी विविध प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येत आहे. हा आजार माणसाच्या अंशी माणसाच्या जोखीमपुर्ण वागणुकीशी किंवा मानसिकतेशी निगडीत असल्याने तो टाळता येणे सहज शक्य आहे.
जिल्हा एड्स प्रतिबधंक व नियंत्रण पथकांतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात मोफत एचआयव्ही तपासणी, समुपदेशन दिशा केल्या जाते. तसेच या उपक्रमामध्ये एचआयव्ही या विषयावर वेगवेगळ्या पद्धतीने कार्य केले जाते. एचआयव्हीचे गांभिर्य लक्षात घेऊन एचआयव्ही तपासणी विवाहपूर्व केल्यास आपल्याला येणाऱ्या पिढीला एचआयव्हीपासून मुक्त ठेऊ शकतो. त्यामुळे नागरीकांनी स्वयंस्फुर्तीने एचआयव्हीची तपासणी करून घ्यावी, एचआयव्हीचे संक्रमण आढळून आल्यास सर्वप्रथम नजीकच्या एआरटी केंद्र किंवा आयसीटीसी केंद्रामध्ये जाऊन औषधोपचार सुरू करावा, तसेच औषधोपचारादरम्यान संतुलित आहार घेणे अत्यावशक आहे. त्यामुळे बाधितांना सर्वसाधारण जीवन जगता येईल, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. टी. जी. धोटे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी