साठे महामंडळाच्या कर्जप्रकरणी तक्रारी करण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. 13 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या कर्जदारांना मिळालेल्या कर्जाच्या रकमेबाबत तक्रारी असल्यास महामंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधवा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
महामंडळाच्या यवतमाळ येथील कार्यालयाचे फलक आणि प्रसिद्ध केलेल्या हॅण्डबिलमधील तपशिलातील लाभार्थींच्या नावासमोर जी रक्कम दर्शविली असेल ती संपूर्ण रक्कम संबंधित लाभार्थींना मिळाली नसल्यास  किंवा कर्ज वितरणाबाबत तक्रारी असल्यास hccidcrimkd@gmail.com किंवा दूरध्वनी क्रमांक 022-22672585, 27571485 यावर संपर्क साधावा, यामुळे याप्रकरणी तपास करणे सोयीचे होईल, असे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी