डीएलएड प्रवेशासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
यवतमाळ, दि. 22 : शैक्षणिक वर्ष 2016-17 साठी डीएलएड पदविका प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रवेशासाठी ईच्छुकांनी 21 ते 31 जुलै दरम्यान अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवेशाबाबत संपूर्ण माहिती www.mscert.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्याची प्रक्रिया 9 जून पासून सुरू करण्यात आली होती. न्यायालयीन प्रक्रियेमुळे स्थगिती देण्यात आली होती. याप्रकरणी नागपूर खंडपिठाने दिलेल्या आदेशानुसार प्रवेश प्रक्रिया करण्यात आली आहे. 9 जून रोजी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज प्रक्रिया पुर्ण केली होती, त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. ज्या उमेदवारांनी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी या कालावधीत अर्ज पूर्ण भरून घ्यावा लागेल. 21 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान संबंधित उमेदवारांनी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत जाऊन भरलेल्या अर्जाची सर्व मूळ प्रमाणपत्रावरून पडताळणी करून घ्यावी लागेल. पडताळणी केंद्रांची यादी परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रवेशाबाबतचे संभाव्य वेळापत्रक आणि सूचनांची सविस्तर माहिती परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी