ऑगस्ट महिन्यात ‘न्याय आपले दारी’
यवतमाळ, दि. 22 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा वकील संघातर्फे ‘न्याय आपले दारी’ संकल्पनेंतर्गत मोबाईल लोकअदालत तसेच कायदेविषयक शिबिराचे आयोजन संपूर्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी ऑगस्ट महिन्याभरात दररोज आयोजित करण्यात येणार आहे.
1 ऑगस्ट रोजी यवतमाळ जिल्हा न्यायालय आणि जिल्हा कारागृह, 2 ऑगस्ट रोजी वटफळी, ता. नेर, 3 ऑगस्ट रोजी पोलिस ठाणे नेर, 4 ऑगस्ट रोजी नायगाव, 5 ऑगस्ट रोजी पहूर, ता. बाभूळगाव, 6 ऑगस्ट रोजी कोठा, 7 ऑगस्ट रोजी नांझा, ता. कळंब, 8 ऑगस्ट रोजी वाटखेड, 9 ऑगस्ट रोजी वडकी, ता. राळेगाव, 10 ऑगस्ट रोजी पाटणबोरी, 11 ऑगस्ट रोजी उमरी रोड, ता. केळापूर, 12 ऑगस्ट रोजी मुकुटबन, 13 ऑगस्ट रोजी पाटणा, ता. झरीजामणी, 14 ऑगस्ट रोजी चारगाव, 15 ऑगस्ट रोजी राजूर, ता. वणी, 16 ऑगस्ट रोजी नवरगाव, 17 ऑगस्ट रोजी बोटोणी, ता. मारेगाव, 18 ऑगस्ट रोजी अंजी, 19 ऑगस्ट रोजी पारवा, ता. घाटंजी, 20 ऑगस्ट रोजी ब्राम्हणवाडा, 21 ऑगस्ट रोजी महाळुंगी, ता. आर्णी, 22 ऑगस्ट रोजी मुडाना, 23 ऑगस्ट रोजी धनोडा, ता. महागाव, 24 ऑगस्ट रोजी बिटरगाव, 25 ऑगस्ट रोजी दराटी, ता. उमरखेड, 26 ऑगस्ट रोजी काळी (दौलत), 27 ऑगस्ट रोजी शेंबाळपिंप्री, ता. पुसद, 28 ऑगस्ट रोजी साखरा, 29 ऑगस्ट रोजी सिंगद, ता. दिग्रस, 30 ऑगस्ट रोजी दारव्हा पोलिस ठाणे, 31 ऑगस्ट रोजी लाडखेड हे मोबाईल लोकअदालत आणि शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील दुर्गम भागात जाऊन पक्षकारांमधील वाद मिटविले जाणार आहे. तसेच कायदेविषयक जनजागृती करण्यात येणार आहे. नागरीक विधीसाक्षर व्हावे, तसेच न्याय मिळण्यापासून कोणीही वंचित राहू  नये, यासाठी न्याय आपले दारी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश दि. रा. शिरासाव यांनी सांगितले. या उपक्रमाचा नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सचिन आगरकर आणि जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष महेंद्र ठाकरे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी