बळीराजाही देशाचा जवानच
- कॅप्‍टन अकित शर्मा
* जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन
*जोडमोहा, रूंझा, उमरी येथे कार्यक्रम
यवतमाळ, दि. १८ : जवान सीमेवर देशाचे रक्षण करतो, त्‍याचप्रमाने शेतकरी हा धान्‍य पिकवून देशाला परीपूर्ण करतो. त्‍यामुळे दोन्‍ही जवानांची कामगिरी वेगळी असली तरी देशासाठी ही महत्‍वाची आहे. त्‍यामुळे शेतकऱ्यांनी आपले मनोधैर्य खचू न देता देशहितासाठी सैनिकाप्रमाणे प‍रीस्थितीशी लढावे, अशी संदेश कॅप्‍टन अंकीत शर्मा देणार आहे.
सोमवारी, दि. १८ जुलै रोजी सकाळी १० वाजता जिल्‍हाधिकारी कार्यालयात भारतीय सेनेच्‍या भुसावळ २० बटालीयन बिग्रेड आफ दि गार्ड यांच्‍या सायकल रॅलीला जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी निवासी उपजिल्‍हाधिकारी राजेश खवले उपस्थित होते. या रॅलीतील १२ जवान चंद्रपूर जिल्‍ह्याकडे जाताना मार्गावरील जोडमोहा, रूंझा आणि उमरी येथे शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. आपणही देशाचे सैनिक असून आलेल्‍या परिस्थितला समोर जाण्‍यासाठी मनोधैर्य वाढविणार आहे.
            भारतीय सेनेच्‍या भुसावळ २० बटालियन बिग्रेड आफ दि गार्ड यांच्‍या रायझिंग डे निमित्‍त बटालियनमधील जवानांच्‍या घरी जावून त्‍यांचा सन्‍मान करण्‍यात येतो. यासाठी ही बटालीयन भुसावळ येथून ५ जुलै रोजी सायकल रॅलीने जिल्‍हा मार्गक्रमन करीत आहे. यवतमाळ जिल्‍ह्यातील महागाव तालुक्‍यातील सवना येथील महेश संजय वाटकर या जवानाचा सत्‍कार करण्‍यात आला. यांनतर जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांची भेट घेतली असता जिल्‍ह्यात शेतकरी दुष्‍काळाच्‍या गर्तेत सापडला असून त्‍यांच्‍यासाठी ‘बळीराजा चेतना अभियान’ राबविण्‍यात येत असल्‍याचे सांगितले. त्‍यामुळे ही बटालीयन आता या जवानांचा सत्‍काराबरोबरच शेतकऱ्याचे मनोधैर्य वाढविण्‍यासाठी जोडमोहा, रूंझा आणि उमरी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. देशाची शान हा शेतकरी असून त्‍यामुळेच देश बलाढ्य होत असल्‍याचे पटवून देणार आहे. ही  सायकल रॅली काढण्‍यामागील उद्देश म्‍हणजे जे जवान बटालियनमध्‍ये कार्यरत आहे, देशाचे संरक्षण करीत आहे, त्‍या जवानाला आणि त्‍यांच्‍या कुटुंबियांना गावात सन्‍मान मिळावा, त्‍यांच्‍या कुटुंबियांची जबाबदारी ही त्‍या गावकऱ्याची  असल्‍याचे यातून सांगण्‍यात येत आहे.
आर्णीत जवानांनी वाचविले दोघांचे प्राण
नांदेड मार्गे यवतमाळ जिल्‍ह्यात ही बटालियन येत असताना आर्णी येथे दोन ट्रकची धडक झाली. यावेळी एक वाहन चालक ट्रकमध्‍ये अडकून पडला. त्‍याला या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. वेळेवर मदत मिळाल्‍याने वाहन चालकांचे प्राण वाचले. तर दुसऱ्या वाहन चालकाचा हाताला गंभीर दुखापत झाली त्‍यांना दोघांनाही रूग्‍णालयात उपचारासाठी पाठविण्‍यात आले.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी