सुशिक्षीत आदिवासी युवकांना स्पर्धापरीक्षापूर्व प्रशिक्षण
यवतमाळ, दि. 12 :दिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, अचलपूर कॅम्प, परतवाडाच्यावतीने आदिवासी सुशिक्षीत बेरोजगार युवकांना स्पर्धा परिक्षापूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी 25 जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशिक्षणासाठी उमेदवाराचे वय 18 ते 30 र्षादरम्यान असावे. उमेदवाराने एसएससी परिक्षा उत्तीर्ण आणि सध्या कोणतेही शिक्षण किंवा प्रशिक्षण घेत नसावा. पात्र इच्छुक उमेदवारांनी प्रशिक्षण सत्रासाठी दिनांक 25 जुलैपर्यंत आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र स्टेट बँकेजवळ, अचलपूर कॅम्प, परतवाडा ता.अचलपूर जिल्हा अमरावती, दूरध्वनी 07223-221205 आणि कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व सहाय्य केंद्र, धारणी, जिल्हा अमरावती येथे अर्ज करावेत. अर्जासोबत शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, एसएससीची गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र, आदिवासी विकास कार्यालयातील नाव नोंदणी कार्ड जोडावे लागणार आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी अर्ज करावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी