जिल्हा न्यायालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
यवतमाळ, दि. 21 : यवतमाळ जिल्हा व सत्र न्यायालयात रविवारी, दि. 17 जुलै रोजी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा पार पडला. जिल्हा व सत्र न्यायाधीश दि. रा. शिरासाव अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून गीता शिरासाव, जिल्हा न्यायाधीश ए. एस. वाघमारे, पी. एस. खुने उपस्थित होते.
जिल्हा न्यायालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनी दहावी आणि बारावीमध्ये 75 टक्क्यांपेक्षा जादा गुण मिळविले आहे, त्यांचा उपस्थितांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, गौरवचिन्ह, भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी पालक आणि पाल्यांनी मनोगत व्यक्त केले, तसेच प्रमुख पाहुण्यांनी संवाद साधला. श्री. शिरासाव यांनी गौरव करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर श्रीमती सी. एम. ढबाले यांनी सूत्रसंचालन केले. न्यायालय व्यवस्थापक विरेंद्र वानखेडे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस. एम. आगरकर यांनी पुढाकार घेतला.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद