रद्द, व्यवपगत टॅक्सी परवान्याचे नुतनीकरण
यवतमाळ, दि. 5 :  रद्द आणि व्यपगत आटोरिक्षाचे नुतनीकरण करण्यात येत असून नुतनीकरणास आता दिनांक 15 जुलै पर्यंत मर्यादा देण्यात आली आहे. या कालावधीपर्यंत आपल्या टॅक्सीचे नुतनीकरण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पूर्वी वेळोवेळी नुतनीकरणासाठी एकवेळची संधी म्हणून दि. 15 जुलै ही अंतिम मुदत असून या तारखेपर्यंत रद्द आणि व्यपगत परवान्याचे नुतनीकरण करणे आवश्यक आहे. योग्यता प्रमाणपत्रासाठी महानगराकरीता 25 हजार व इतर क्षेत्राकरीता 20 हजार इतके सहमत शुल्क आकारण्यात येणार आहे. सदर शुल्क भरून आपल्या टॅक्सीचे नुतनीकरण करावे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी