576 केएल केरोसिनचे द्वारवितरण प्रणालीने वितरण
यवतमाळ दि. 15 : जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना वितरीत करण्यासाठी जुलै महिन्याचे केरोसिन नियतन मंजूर झाले असून नागरीकांना वितरीत करण्यासाठी सदर नियतन घाऊक, अर्धघाऊक परवानाधरकांना उचल करण्याबाबत कळविण्यात आले आहे. यात 1104 केएल पैकी 576 केएल केरोसिन द्वारवितरण प्रणालीने वितरीत करण्यात येणार आहे.
नियतनाबाबत सर्व तहसिलदारांना कळविण्यात आले असून शिधापत्रिकाधारकांना त्यांना देय असलेल्या प्रमाणात वितरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यानुसार परवानाधारकांनी मुदतीत नियतनाची उचल करून त्याचे वाटप करावयाचे आहे. उचल उशिरा केल्यास मुदत वाढ देण्यात येणार नाही. तसेच वाटप व्यवस्थित होते किंवा नाही यावर लक्ष ठेवण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहे.
केरोसिनचे वाटप आकारणी करण्यात आलेल्या दरातच करावयाचा आहे. महिन्याच्या अखेरच्या तारखेस तालुका निहाय वाटपाची यादी सादर करणे आवश्यक आहे. प्रती महिना 1104 केएल इतक्या केरोसिन वाटपाचे नियतन करण्यात आले असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.

 000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी