नाबार्डतर्फे आर्थिक साक्षरता जागरूकता कार्यक्रम
यवतमाळ, दि. 21 : नाबार्डतर्फे बँकेत खाते उघडण्याचे महत्त्व समजावून देण्यासाठी तसेच शासनाच्या सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत विमा आणि पेंशनचा लाभ लोकांनी घ्यावा, यासाठी यवतमाळ तालुक्यातील लासिना येथे आर्थिक साक्षरता जागरूकता कार्यक्रम पार पडला.
नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक प्रविण मेश्राम, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री. चौधरी, वरीष्ठ प्रबंधक श्री. खत्री, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे श्री. देशमुख आदी उपस्थित होते. श्री. मेश्राम यांनी बँकेचे खाते विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी कशाप्रकारे महत्त्वाचे आहे, याची माहिती दिली. सर्वांनी बँकेत खाते काढून चांगले व्यवहार करून आपल्या आर्थिक उन्नतीसाठी बँकेची मदत घ्यावी. तसेच नियमित बचतीचे महत्त्व, आर्थिक नियोजनाबाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली. श्री. देशमुख यांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती, जीवन सुरक्षा, अटल पेंशन, पिक विमा आदी योजनांची माहिती देऊन त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. श्री. खत्री यांनी बँकेच्या विविध योजनांची माहिती सांगून सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. शेतीला जोडधंद्याची साथ दिल्यास चांगला आधार मिळणार असल्याचे सांगितले.
यावेळी नाबार्डच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमासाठी लासिनाच्या सरपंच श्रीमती कांबळे, संत कबीर संस्थेचे अरविंद बोरकर, निलेश खंदार, संदीप घोटे, अवधूत चंदनखेडे यांनी पुढाकार घेतला.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी