सैन्यदलात अधिकारी होणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी पूर्व प्रशिक्षण

यवतमाळ, दि. 15 : संघ लोकसेवा आयोगाच्या कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेसची परीक्षेची पूर्व परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी नाशिक येथे 2 ऑगस्ट ते 15 ऑक्टोबर पर्यंत मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी पात्र व इच्‍छुक उमेदवारांची निवड 26 जुलै रोजी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयात करण्यात येणार आहे.
संघ लोकसेवा आयोगाच्या कंबाईड डिफेन्स सर्व्हीसेसची परिक्षा 23 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणची नि:शुल्क व्यवस्था करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्या कार्यालयात सकाळी 11.30 वाजता उपस्थित राहावे तसेच मुलाखतीसाठी येताना PCTC Training च्या Google Plus पेजवरील  दिलेल्या चेकलिस्टप्रमाणे सर्व कागदपत्रे आणि महत्त्वाच्या तारखांचे अवलोकन करावे. तसेच त्याच्या दोन प्रतीमध्ये माहिती भरून सादर करावे. याबाबत अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशि येथे दूरध्वनी क्रमांक 0253-2451031, 2451032 यांच्याशी संपर्क साधवा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी धनंजय सदाफळे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी