माजी सैनिक अंशदायी स्वास्थ योजनेचे सभासद होण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. 12 : माजी सैनिक अंशदायी स्वास्थ योजनेचे (ईसीएचएस) सदस्य वाढविण्यासाठी अमरावती येथील ईसीएचएस पॉलिक्लिनीकची टीम 15 जुलै रोजी यवतमाळ येथे येत आहे. यात जिल्ह्यातील निवृत्तीवेतनधारक माजी सैनिक, विधवा, अद्यापही ईसीएचएसचे सदस्य झालेले नाहीत त्यांना सकाळी 10.30 वाजता सदस्य बनविण्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ईसीएचएस सदस्य बनविण्याकरिता निवृत्तीवेतनधारक माजी सैनिक, विधवा यांनी पीपीओ, डिसचार्ज बुक, माजी सैनिक ओळखपत्राची छायांकित प्रत, रक्ततपासणीची मूळ प्रत, प्रतिज्ञापत्र, पाच रंगीत फोटो, निवृत्तीवेतन घेत असलेल्या बँकेतून वैद्यकीय भत्ता घेत नसल्याबाबत बँक मॅनेजरचे प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील ईसीएचएस सदस्य नसलेल्या निवृत्तीवेतनधारक माजी सैनिक, विधवांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी फ्लाईट लेफ्टनंट धनंजय सदाफळ यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी