संशोधन, विस्तार सल्लागार समितीची सभा
यवतमाळ, दि. 22 : मध्य विदर्भ विभागाची विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समितीची 53वी सभाग विभागीय कृषि संशोधन केंद्रात मंगळवारी, दि. 19 जुलै रोजी पार पडली. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. आर. जी. दाणी अध्यक्षस्थानी होते.
यावेळी संशोधन संचाक डॉ. डी. एम. मानकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. पी. जी. इंगोले, कार्यकारी परिषद सदस्य नितीन हिवसे, विभागीय कृषि सहसंचालक विजय लव्हाळे, विभागीय सांक्षिक अजय राऊत, सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. एम. गाडे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. सी. यू. पाटील, कार्यक्रम समन्वयक डॉ. ए. वाय. ठाकरे उपस्थित होते.
डॉ. दाणी यांनी कृषि विद्यापिठाचे संशोधन व शिफारशी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचे कार्य करीत आहे. यासाठी कृषि विभाग आणि आत्मा हे महत्त्वाची भूमिका बजावीत आहे. विद्यापिठाच्या संशोधनामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला असून येत्या काळातही हा सल्ला वस्तुनिष्ठ असावा. विद्यापिठाच्या संशोधनात्मक शिफारशी राबविणे आवश्यक असून त्याशिवाय शेतकऱ्यांच्या नेमक्या अडचणी समोर येणार नाही. जलयुक्त शिवार योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरणार असून शेतकऱ्यांच्या गरजेप्रमाणे संशोधनाची दिशा ठरवावी, असे आवाहन केले.
सभेत कृषि हवामानशास्त्र अहवालाचे सादरीकरण करण्यात आले. तसेच विद्यापिठाने विकसित केलेल्या विविध पिकांच्या वाण, तंत्रज्ञान, कृषि विस्तार आणि शिफारसींचे माहिती उपस्थितांना देण्यात आली. कार्यक्रमात डॉ. मानकर, श्री. हिवसे, श्री. लव्हाळे, श्री. राऊत यांनी मार्गदर्शन केले. डॉ. पाटील यांनी प्रास्ताविक केले. विषय विशेषज्ञ निलिमा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कनिष्ठ संशोधन सहायक संदिप कदम यांनी आभार मानले.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी