महाबीजच्या बियाणे फरकाची रक्कम 31 ऑगस्टपूर्वी मिळणार
* 16 ऑगस्टपर्यंत कागदपत्रांची पूर्तता करावी
यवतमाळ, दि. 22 : शेतकऱ्यांना कडधान्याची लागवड करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी यावर्षीच्या खरीप हंगामात महाबीजची मुग, तूर, उडिद बियाणांची विक्री मागील वर्षीच्याच दराप्रमाणे करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. मात्र यात ज्या शेतकऱ्यांनी जादा दरानी बियाणांची खरेदी केली आहे, त्यांना 31 ऑगस्टपूर्वी फरकाची रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
मागील वर्षीच्याच दराने विक्री करण्यास निर्णय महाबीजने 19 जून पासून सुरू केली. त्यानुसार या आदेशापूर्वी बियाणे खरेदी केलेल्या बियाण्यांचे टॅग, लेबल व बँक खात्याची, पासबुकची प्रत नजिकच्या महाबीज विक्रेत्यांकडे किंवा महाबीज कार्यालयाकडे 15 जुलैपर्यंत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. याबाबत 18 जुलै रोजी कृषि मंत्री यांनी परतावा मिळण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, असे निर्देश दिले. त्यानुसार आता ही कागदपत्रे 16 ऑगस्टपर्यंत जमा करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. या परताव्याची रक्कम 31 ऑगस्टपूर्वी संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल, यासाठी शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन महाबीजचे वितरण महाव्यवस्थापक रामचंद्र नाके यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी