शिष्यवृत्तीचे आवेदन प्रस्ताव सादर करावे
यवतमाळ, दि. 22 : समाज कल्याण विभागाच्यावतीने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीच्या विविध योजना राबविण्यात येते. या योजनांसाठी शाळांच्या मुख्याध्यापकांनी मुदतीत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पाचवी ते सातवी मधील अनुसूचित जाती, विजा/भज आणि विमाप्र मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती देण्यात येते. आठवी ते दहावीमधील अनुसूचित जातीच्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, नववी ते दहावीच्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, पहिली ते दहावीतील अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती, पाचवी ते दहावीमधील वर्गातून प्रथम आणि द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजा/भज, विमाप्र गुणवत्ता शिष्यवृत्ती, दहावीमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजा,/भज, विमाप्र विद्यार्थ्यांना बोर्ड फी आणि शिक्षण फी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या प्रशिक्षणार्थ्यांना विद्यावेतन, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील विना अनुदानित शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्ना शिक्षणशुल्क प्रतीपुर्ती, अपंग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देण्यात येते.
या शिष्यवृत्तींसाठी सर्व मान्यताप्राप्त शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे आवेदन प्रस्ताव दि. 31 ऑगस्टपर्यंत www.mahaeschool.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करून जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयास सादर करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाजकल्याण अधिकारी जया राऊत यांनी केले आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी