26 जुलैपासून जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा
यवतमाळ, दि. 25 : राज्य शासनाच्या क्रीडा व युवकसेवा संचालनालय, पुणे अंतर्गत, जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, यवतमाळतर्फे सन 2016-17 या सत्रातील यवतमाळ जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धा दिनांक 26 जुलैपासून यवतमाळ येथील जिल्हा क्रीडा संकुल नेहरू स्टेडीयम येथे सुरु होत आहे. या क्रीडा स्पर्धा 14 वर्ष मुले 17 वर्ष मुले व मुली या वयोगटात आयोजित करण्यात येत असून स्पर्धेत्‍ सहभाग घेणाऱ्या खेळाडूंची जन्म तारीख 14  वर्षे मुलांसाठी 1 सप्टेंबर 2002 आणि 17 वर्षे मुले व मुलींसाठी 1 सप्टेंबर 1999 किंवा त्यानंतर जन्म झालेला असावा, याची संबंधित शाळांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा क्रीडा अधिकारी, यवतमाळ यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल