माजी सैनिकांचा पाल्यांना शिष्यवृत्ती
*15 ऑक्टोबरपूर्वी अर्ज सादर करावेत
यवतमाळ, दि. 28 : कल्याणकारी निधीमधून माजी सैनिकांचा अथवा त्यांच्या विधवा पत्नीच्या पाल्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना आहे. मागिल शैक्षणिक वर्षात दहावी, बारावी, पदविका, पदवी परिक्षेत किमान 60 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या तसेच पी.एच.डी. किंवा तत्सम विषयामध्ये संशोधनपर अभ्यास करणाऱ्या आणि 2016-17 या शैक्षणिक वर्षात पुढील शिक्षण घेणाऱ्या संबंधित विद्यार्थ्यांनी 15 ऑक्टोबर 2016 पूर्वी आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
एखाद्या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू झाल्यास प्रवेश दिनांकापासून एका महिन्याच्या आत अर्ज सादर करावा लागणार आहे. ज्या पाल्यांनी सीईई, जेईईसाठी गॅप घेऊन पहिल्या वर्षात प्रवेश घेतला आहे, त्यांना गॅस सर्टिफीकेट जोडणे आवश्यक आहे. शिष्यवृत्तीसाठी विहित नमुना अर्ज जिल्हा सैनिक कल्याण आणि yavatmal.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध असून अर्जासोबत माजी सैनिक, विधवांच्या ओळखपत्राची झेरॉक्सप्रत, बोनाफाईड सर्टिफीकेट, गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत, इतर कोणतीही शिष्यवृत्ती मिळत नसल्याचे शाळा, महाविद्यालयाचे प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या दुरध्वनी क्र. 07232-245273 वर संपर्क साधावा.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी