महा-ई-सेवा केंद्रावर दरपत्रक लावणे बंधनकारक
*दरपत्रक नसल्यास केंद्र बंद करणार
यवतमाळ, दि. २५ : जिल्‍हा प्रशासनातर्फे नागरीकांना विविध प्रकारचे दाखले तातडीने मिळावे, यासाठी महा-ई-सेवा केंद्र वितरीत करण्‍यात आले. याठिकाणी शासकीय सेवा दरपत्रक लावणे बंधकारक असून याची तपासणी करण्‍यात येणार आहे.
            नागरीकांना महसूली विभागाचे दाखले मिळण्‍यासाठी महा-ई-सेवा केंद्र देण्‍यात आले. मात्र केंद्रचालक दर्शनी भागात मिळणाऱ्या सेवांचे दरपत्रक लावत नसल्‍याची बाब उघडकीस आली.  त्‍यामुळे नागरीकांकडून अतिरिक्‍त पैशाची लुट या केंद्रावर होत आहे, अशी तक्रार लोकशाही दिनामध्‍ये जिल्‍हा प्रशासनाला प्राप्‍त झाली होती.  त्‍यामुळे जिल्‍हा प्रशासनाने उपविभागीय अधिकारी यांना आपल्‍या भागातील महा-ई-सेवा केंद्राची तपासणी तलाठी आणि मंडळ अधिकारी, क्षेत्रिय कर्मचारी यांच्‍यामार्फत करण्‍याचे आदेश देण्‍यात आले. ज्‍या केंद्रावर दरफलक लावले नसल्‍यास, असे महा-ई-सेवा केंद्र बंद करावे. तसेच दरफलक लावल्‍यानंतरच हे केंद्र सुरू करण्‍यात यावे, असे आदेश देण्‍यात आले आहे. दरपत्रकानुसार नागरीकांकडून वय, राष्ट्रीयत्‍व, अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, नॉन  क्रिमीलेअर प्रमाणपत्र, उत्‍पन्‍नाचा दाखला, तात्‍पुरता रहिवासी दाखला, ज्‍येष्‍ठ नागरीक प्रमाणपत्र, ऐपतीचा दाखला, सांस्‍कृतिक कार्यक्रम परवाना, अधिकार अभिलेखाची प्रमाणित प्रत, अल्‍पभू-धारक दाखला, भूमिहिन शेतमजूर असल्‍याचा दाखला, शेतकरी असल्‍याचा दाखला, डोंगर, दुर्गम क्षेत्रात राहत असल्‍याचा प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र साक्षांकीत करणे यासाठी ३३ रूपये तर प्रतिज्ञाप्रत्रासोबत जातीचे प्रमाणपत्र आणि प्रतिज्ञापत्रासोबत नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र यासाठी ५६ रूपये आकारण्‍यात येतात. या व्‍यतिरिक्‍त नागरीकांनी जास्‍त रक्‍कम महा-ई-सेवा केंद्रामध्‍ये देऊ नये, असे आवाहन जिल्‍हा प्रशासनाकडून करण्‍यात आले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी