कृषि विज्ञान केंद्रात कृषि जागृती सप्ताह
यवतमाळ, दि. 8 : येथील कृषि विज्ञान केंद्रामध्ये कृषि दिनानिमित्त कृषि सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.
कृषि विज्ञान केंद्र, विभागीय कृषि संशोधन केंद्र, वसंतराव नाईक जैव तंत्रज्ञान महाविद्यालयातर्फे यवतमाळ प्रक्षेत्रात वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी उपस्थित नागरीकांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला कार्यक्रम समन्यक डॉ. ए. वाय. ठाकरे, विभागीय कृषि संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. सी. यू. पाटील, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र गाडे उपस्थित होते. 2 जुलै रोजी जवाहर कन्या माध्यमिक विद्यालय येथे सहायक प्राध्यापक श्रीमती निलिमा पाटील यांनी शालेय परिसरात पर्यावरण जागृती आणि वृक्ष लावगड कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. 4 जुलै रोजी डॉ. गोपाल ठाकरे, प्रा. अंजली गहरवार यांनी यांनी मारेगाव तालुक्यातील वागधरा येथील शेतींना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी कपाशी, मूग, सोयाबीन पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना पिक व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्यांचे निराकरण केले. 5 जुलै रोजी कृषि विज्ञान केंद्रात शेतकरी आणि कृषक महिलांसाठी भाजी पिक लागवड तंत्रज्ञान व कृषि प्रक्रिया विषयावरील एक दिवसीय प्रशिक्षण पार पडले. यात भाजीपिकांचे खरीप हंगामातील व्यवस्थापन आणि कृषि प्रक्रिया उद्योग उभारणी व व्यवसायीकरणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. 6 जुलै रोजी माणिकवाडा येथे आयोजित प्रशिक्षणात खरीप पिकांचे व्यवस्थापन तंत्रज्ञानाबाबत डॉ. ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्रा. निलिमा पाटील यांनी आकाशवाणीच्या किसानवाणी कार्यक्रमात परसबाग लागवडीमध्ये महिलांचा कार्यक्षम सहभाग याबाबत मार्गदर्शन केले. तसेच महिलांमध्ये पोषक आहाराबाबत जागृती करण्यात आली. 7 जुलै रोजी नेर येथे प्रा. दिगांबर उंद्रटवाड यांनी शाश्वत शेतीसाठी कृषि पुरक व्यवसायावर मार्गदर्शन केले. तसेच कृषि सप्ताहाचा समारोप विभागीय कृषि संशोधन केंद्रात करण्यात आला. संशोधन संचालक डॉ. सी. यू. पाटील अध्यक्षस्थानी होते. यात शेतकऱ्यांना वर्षभरात विविध पिकांचे हंगामनिहाय व्यवस्थापन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. वृक्षलागवडीसोबतच वृक्षसंवर्धन करण्याचे आवाहन उपस्थितांना करण्यात आले.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी