ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत राळेगाव सर्कलमध्ये विविध कार्यक्रम






यवतमाळ, दि. 10 : केंद्र शासनाच्या ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत 14 एप्रिल ते 5 मे या कालावधीत राळेगाव सर्कलमध्ये आ.प्रा.अशोक ऊईके यांच्या नेतृत्वात विविध कार्यक्रम घेण्यात आले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त करंजी ता.केळापूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच गावातील नागरीक, शेतकरी, शेतमजूर दलीत यांच्याशी संवाद साधून त्यांना ग्रामस्वराज्य अभियानअंतर्गत शासनाच्या विविध योजनेची माहिती देण्यात आली. स्वच्छ भारत पर्व ग्रामस्वराज्य अभियानअंतर्गत शरद ता. कळंब येथे ग्रामस्वच्छता, हागणदारीमुक्त गाव, गावासाठी प्रचार प्रसार जनजागृती, प्रत्येक घरी शौचालय अभियानाला गती द्यावी म्हणून कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमाला गावातील सरपंच, उपसरपंच, शेतकरी, शेतमजूर महिला इत्यादी व शासनाचे कर्मचारी उपस्थित होते.
उज्वला पंचायत अभियानांतर्गत डेहणी ता. बाभुळगाव येथे उज्वला गॅस कनेक्शनचे वितरण तसेच या  कार्यक्रमांतर्गत गॅस कनेक्शन वितरण, पात्र ग्राहक नोंदणी अभियानाच्या माध्यमातून किन्ही जवादे ता.राळेगाव येथे कार्यक्रम घेण्यात आले. पंचायत राज अभियानांतर्गत डोंगरखर्डा ता. कळंब येथे कार्यक्रम घेण्यात आले आणि शासनाच्या योजनांची माहिती देण्यात आली. ग्रामशक्ती अभियानांतर्गत करंजी ता.केळापूर मागासा बहूल गावामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री सौभाग्य योजना, जनधन, स्वास्थ्य सुरक्षा मिशन, जीवनज्योती, मातृवंदना योजनाची माहिती नागरीकांना देण्यात आली. प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेमार्फत शंभर गरजू कुटूंबांना गॅसचा लाभ देण्यात आला.
आयुष्यमान भारत अभियानांतर्गत वाटखेड, सोनुर्ली, गोपाल नगर, श्रीरामपूर, बरडगाव, मांडवा, मेंगापूर, संगम (मेंगापूर), इचोरा, आष्टा या गावामध्ये कार्यक्रम घेण्यात आले आणि ग्रामस्वराज्य अभियानाअंतर्गत ग्रामस्थांना शासनाच्या योजनेची माहिती दिली व जनजागृती केली. किसान कार्यशाळा अभियानांतर्गत राळेगाव तालुक्यातील आदिवासी वस्ती, पारधी बेडा व पोड या भागामध्ये मारेपोड, पारधी बेडा, पळसकुंड, सिंधी पोड, खेमकुंड, भिमसेनपुर, खैरगाव कासार, बोराटी, तेजणी, डोंगरगाव, भांब या गावांना प्रत्यक्ष भेटी देवून शासनाच्या योजनेची माहिती दिली. आजीवीका व कौशल्य विकास अभियानांतर्गत करळगाव, सुकळी, पंचगव्हाण, कृष्णापूर येथे भेटी देवून आजीवीका व कौशल्य विकास या योजनेचे बचतगट, स्वयंरोजगार गट, कौशल्य विकास प्रशिक्षणार्थी मेळावा पंचायत समिती बाभुळगाव येथे घेण्यात आला. सदर कार्यक्रमाला तालुक्यातील बचत गट, स्वयंरोजगार गट कौशल्य विकास प्रशिक्षणार्थी हजर होते.
0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी