‘महाराष्ट्र वार्षिकी - 2018’ चे जिल्हाधिका-यांचे हस्ते विमोचन


v जिल्हा माहिती कार्यालयात विक्रीसाठी संदर्भग्रंथ उपलब्ध

यवतमाळ, दि. 25 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र वार्षिकी – 2018’ चे विमोचन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, माहिती व सुचना केंद्राचे राजेश देवते, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर उपस्थित होते.
ज्ञान व माहितीचा खजिना असलेल्या महाराष्ट्र वार्षिकीमध्ये महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील माहिती आकडेवारीसह देण्यात आली आहे. यात महाराष्ट्राचा इतिहास, वन, नद्या, कृषी, क्रीडा, कला, साहित्य, पुरस्कार आदी घटकांचा समावेश करण्यात आला आहे. या वार्षिकीचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शासनाच्या सर्व विभागांची  कामकाज पध्दती, संरचना, महत्वाचे निर्णय, धोरणे, योजना, दुरध्वनी यांची एकत्रित माहिती अभ्यासकांना यात उपलब्ध होणार आहे. या शिवाय मंत्रीमंडळाचे निर्णय, महाराष्ट्र शासनाशी संबंधीत गेल्या वर्षभरातील घडामोडींचा समावेशही यात केला आहे.
भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, उपप्रधानमंत्री, केंद्राचे व महाराष्ट्राचे मंत्रीमंडळ, आजवरचे विधानसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती व उपसभापती, महाराष्ट्र विधिमंडळ सदस्यांची यादी, जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या दुरध्वनी क्रमांकाची माहिती यात समाविष्ट करण्यात आल्याने हा संदर्भग्रंथ प्रत्येक वाचकाच्या संग्रही असणे आवश्यक आहे. हा संदर्भग्रंथ विविध स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, अभ्यासक, प्राध्यापक, पत्रकार, लोकप्रतिनिधी, अधिकारी व सामान्य ज्ञानाची आवड असणाऱ्या सर्व नागरीकांना उपयुक्त आहे. ‘महाराष्ट्र वार्षिकी 2018’ या संदर्भग्रंथांची किंमत फक्त 250 रुपये असून जिल्हा माहिती कार्यालय, यवतमाळ येथे हा अंक विक्रीसाठी उपलब्ध आहे. अंकाच्या मर्यादीत प्रती असल्याने संबंधितांनी त्वरीत संपर्क करून सदर अंक खरेदी करावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी