शेतक-यांसाठी 20, 26 व 27 मे रोजी ‘अर्ज द्या, कर्ज घ्‍या’ मेळावा



v बळीराजा चेतना अभियानातर्फे बॅंक शाखा स्‍तरावर कर्ज मेळावे
यवतमाळ, दि. 18 : खरीप हंगामाला सुरवात झाली असून पेरणी तोंडावर आलेली आहे. अशावेळी शेतक-यांना बॅंकाकडून तातडीने कर्ज पुरवठा होण्‍याची गरज आहे. त्‍यामुळे बळीराजा चेतना अभियानांतर्गत जिल्‍हयातील 239 बॅंकांच्‍या शाखा स्‍तरावर अर्ज द्या, कर्ज घ्‍या  मेळाव्‍याचे आयोजन करण्यात आले आहे. हे मेळावे 20, 26 27 मे रोजी  घेण्यात येणार आहे. या कर्ज मेळाव्‍याचा लाभ शेतक-यांनी घ्‍यावा. तसेच या कर्ज मेळाव्‍यात आपल्‍या गावातील शेतक-यांना कर्ज मिळवून देण्‍यासाठी ग्रामस्‍तरीय समितीचे अध्‍यक्ष व सचिव यांनी पुढाकार घ्‍यावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.    
             खरीप हंगामात शेतक-यांना कर्जासाठी बॅंकांमध्‍ये चकरा माराव्‍या लागतात. कागपत्रांची पूर्तता करण्‍यासाठी त्रास सहन करावा लागतो. जर वेळीच पतपुरवठा झाला नाही तर शेतकरी आपल्‍या शेतामध्‍ये पेरणी करू शकणार नाही. त्‍यामुळे शेतक-यांची कर्जासाठी होणारी पायपीट थांबविण्‍यासाठी, त्‍यांना एकाच छताखाली सुलभरित्‍या कर्ज उपलब्‍ध व्‍हावे, यासाठी मेळावाचे आयोजन मे महिन्‍यात तिसरा रविवार (ता. 20) आणि चवथा शनिवार (ता.26) आणि चवथा रविवार (ता. 27) ला करण्‍यात आले आहे. या  मेळाव्‍यासाठी प्रत्‍येक बॅंकेच्‍या शाखानिहाय एका संपर्क अधिका-यांची नेमणूक करण्‍यात आली आहे. गावातील जे शेतकरी कर्ज मिळण्‍यापासून वंचित राहिलेले आहे, अशा शेतक-यांना या मेळाव्‍यातून कर्ज पुरवठा करण्‍यात येणार आहे.
जिल्‍हयातील ग्रामस्‍तरीय समितीचे अध्‍यक्ष आणि सचिव यांनी आपल्‍या गावामध्‍ये या मेळाव्‍याची माहिती शेतक-यांपर्यंत पोहचून शेतक-यांना कर्ज मिळवून देण्‍यासाठी पुढाकार घ्‍यावा. या मेळाव्‍याला मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक, कोतवाल, पोलीस पाटील यांनी आपल्‍या भागातील शेतक-यांना बॅंकेत सुलभ कर्ज पुरवठा करण्‍यासाठी शेतक-यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.
0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी