जिल्ह्यात मुबलक खत साठा : शेतकऱ्यांनी काळजी करू नये - जिल्हाधिकारी अमोल येडगे

यवतमाळ, दि 8 जुलै जिमाका :- माहे जुलै व ऑगस्ट महिण्यातच खतांची सर्वाधिक मागणी असते, त्याअनुषंगाने जिल्ह्यात खतांचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध असून खतांची कोणतीही टंचाई नसल्याने शेतकऱ्यांनी खतांची काळजी करून नये व विनाकारण खत साठवणूक करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीची सभा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळकपर, जिल्हा कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे, तसेच कृषी विभागाचे अधिकारी व खत कंपण्याचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी आज खतांचा आढावा घेतांना खतांची मागणी किती राहणार, उपलब्ध साठा किती आहे, बफर स्टॉक ठेवण्यात आला आहे का आदिबाबात विचारणा करून राखीव साठ्यातील 50 टक्के युरिया आणि 50 टक्के डिएपी आजच वितरीत करण्याच्या सूचना दिल्या. शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठेबाबतच्या तक्रारी जिल्हा नियंत्रण कक्षाच्या 9403961157 या क्रमांकावर नोंदवाव्या असेही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. खरिप हंगाम 2022-23 मध्ये माहे आक्टोबर-2022 पर्यंत जिल्ह्यात खतांची एकूण मागणी 2 लाख 7 हजार मे. टन गृहीत असणार आहे तर माहे जून-2022 अखेर पर्यंत जिल्ह्यात खतांची एकूण मागणी 1 लाख 6 हजार मे. टन गृहीत धरण्यात आली होती. त्या तुलनेत जिल्ह्यात 31 मार्च 2022 अखेर एकूण 46 हजार 660 मे.टन खत साठा शिल्लक होता तर माहे एप्रिल ते जून 2022 पर्यंत 94 हजार 686 मे. टन खत पुरवठा झाला असल्याने एकूण 1 लाख 41 हजार 346 मे. टन खत साठा जून पर्यंत उपलब्ध झाला आहे. यापैकी खत विक्रेते यांनी 77 हजार 897 मे. टन खतांची विक्री केली असून त्यांचेकडे 63 हजार 374 मे. टन खत साठा शिल्लक आहे. तर 45 हजार मे. टन खत साठा संरक्षीत करून ठेवण्यात आला असल्याने एकूण 67 लाख 877 मे.टन खत साठा अद्यापही शिल्लक आहे. याशिवाय जुलै महिण्यात 22 हजार 700 मे. टन खत उपलब्ध होणे अपेक्षीत आहे. तसेच माहे ऑगस्ट ते ऑक्टोबर पर्यंत देखील जिल्ह्यात खताची आवक राहणार असल्याची माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळेदे यांनी बैठकीत सादर केली. जिल्ह्यात युरियाच्या एकूण 45 हजार 425 मे. टन उपलब्ध साठ्यापैकी 23 हजार 716 मे. टन विक्री झाली असून 24 हजार 948 मे. टन शिल्लक आहे तर माहे जुलै मध्ये 14 हजार 400 मे. टन युरिया प्राप्त होणार आहे. तसेच डिएपी एकूण 12491.94 पैकी 8071 विक्री होऊन 5686 शिल्लक आहे तर माहे जुलै मध्ये 4 हजार मे. टन उपलब्ध होणार आहे. संयुक्त खते 47 हजार 675 मे. टन पैकी 28 हजार 588 विक्री झाले असून 19087 मे. टन शिल्लक आहे आणि माहे जुलै मध्ये अधिक 600 मे. टन प्राप्त होणे अपेक्षीत आहे. बैठकीला कृषी विभागाचे अधिकारी तसेच खत कंपण्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी