“हर घर तिरंगा” उपक्रमात नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग व्हावे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

Ø स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ११ ते १७ ऑगस्ट कालावधीत उपक्रम राबविणार Ø राष्ट्रध्वजाचा सन्मानपुर्वक वापर करा यवतमाळ, दि 11 जुलै जिमाका :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र शासनाच्या सूचनेनुसार 11 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येत असून जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी त्यांच्या घरावर तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी अस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फुर्तीने करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची सभा तसेच हर घर तिरंगा या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबात आढावा सभा आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन येथे घेण्यात आली. याप्रसंगी आमदार मदन येरावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, याचेसह विविध विभागाचे अधिकारी, जिल्ह्यातील समाज सुधारक, लेखक, पत्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वतंत्र संग्रामातील नायकांचे तसेच स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, राष्ट्रभक्तींची भावना वाटीस लागावी हा “हर घर तिरंगा” या उपक्रमामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक नागरिकाने तिरंगा झेंडा संहिताचे पालन करण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकारी यांनी दिल्या. नागरिकांनी खादी ग्रामोद्योग, जेम पोर्टल, स्थानिक विक्रेते, स्वयंसहाय्यकता महिला समूह, इंडियामार्ट ऑनलाईन खरेदी इत्यादि विविध ठीकाणावरून तिरंगा स्वेच्छेने विकत घ्यावा. केंद्रीय गृह विभागच्या 30 डिसेंबर 2021 च्या अधिसूचनेनुसार राष्ट्रध्वज हे हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयारी केलेल्या सुत, पॉलिस्टर, लोकर, सिल्क, खादी यापासून बनविलेल्या कापडाचे असावेत असा बदल करण्यात आला आहे. या सुधारित तरतुदीप्रमाणे तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाचा सन्मानपुर्वक वापर करण्याचे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम राबविण्याबाबत जिल्ह्यातील मान्यवरांकडून याप्रसंगी सूचना आमंत्रित करण्यात आल्या.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी