• उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य महोत्सवात वीज क्षेत्रातील उल्लेखनीय कामगीरीचा जागर • राज्यातील पहिला सौर प्रकल्पाचा पायलट प्रोजेक्ट यवतमाळात

यवतमाळ, दि.२५ जुलै, जिमाका:- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिक्षेपातील आत्मनिर्भर भारत निर्माणमध्ये ऊर्जेची भूमिका महत्वाची असल्याने देशाच्या प्रत्येक गावात, प्रत्येक घरात वीज पोहचविण्यात देशाला यश आल्याचे प्रतिपादन आमदार मदन येरावार यांनी केले. नियोजन भवन यवतमाळ येथे जिल्हा प्रशासन,महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणच्यावतिने घेण्यात आलेल्या उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ,तर प्रा.पंकज पंडित, मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण ,उप महाव्यवस्थापक (PFC) गेवेश पाकमोडे, मयुर मेंढेकर,अधिक्षक अभियंता सुरेश मडावी ,दिपक देवहाते ,सुनिल शेरेकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. आत्मनिर्भर भारत निर्माणसाठी ऊर्जेचे महत्व बघता देशाने ऊर्जा क्षेत्रात मागील आठ वर्षात अनेक उल्लेखनिय कामगीरी केली असल्याचे यावेळी ते म्हणाल. देशाच्या ऊर्जा निर्मिती क्षमतेत १६९ GW ने वाढ झाल्याने देशाची ऊर्जा पुरवणारा देश म्हणून ओळख झाली आहे. १.६ लाख किमी लांबीच्या पारेषण वाहिनी उभारण्यात आल्या.जे संपूर्ण देशाला एका फ्रिक्वेन्सीवर चालणाऱ्या ग्रीडशी जोडते आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील आणि जगात सर्वात मोठी 'एकात्मिक ग्रीड 'असलेला देश म्हणून भारत उदयास आला आहे. २०१८ मध्ये १०० % गावाचे विदयुतीकरण (१८३७४) आणि १०० % घराचे (२.८६ cr.) विदयुतीकरण पुर्ण करण्यात आले आहे.तसेच अपारंपरिक ऊर्जा निर्मितीतही भरीव कामगीरी झाल्याने २०१५ मध्ये असलेली ७६ GW निर्मिती दुप्पट होऊन ती आता१६० GW झाली असल्याचे यावेळी ते म्हणाले. यवतमाळ जिल्ह्यातही महावितरणकडून मागील आठ वर्षात पायाभूत विकासाची अनेक भरीव कामे करण्यात आली आहेत. येणारा काळ हा अपारंपरिक ऊर्जेचा आहे.यवतमाळ तालुक्यातील मांजर्डा येथे राज्यातील पहिला पायलट सौर प्रकल्प उभारण्यात आला आहे. अपारंपरिक ऊर्जेला प्रोत्साहन म्हणून जिल्ह्यात २८९१ शेतकऱ्यांच्या शेतात सौरकृषी पंप बसविण्यात आलेत.तसेच दिनदयाल उपाध्याय,एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत जिल्ह्यात ८५ कोटीच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. तसेच ‘सौभाग्य योजनेत’ दारिद्रय रेषेखालील ग्राहकांना मोफत तर दारीद्रय रेषेवरील ग्राहकांना ५०० रूपये या माफक दरात जिल्ह्यात एकून १४३० नविन वीज जोडण्या देण्यात आल्या.उच्चदाब वितरण प्रणाली योजनेत जिल्ह्यात ११० कोटी रूपये खर्च करून पायाभूत सुविधा निर्माण करण्यासह ५३५६ नविन कृषी पंपाना वीज जोडण्या देण्यात आल्याचे यावेळी त्यांनी सांगीतले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ऊर्जा महोत्सवाच्या संकल्प आणि उद्दिष्टावर भर देण्याचे आवाहन केले. या महोत्सवादरम्यान जिल्ह्यातील कृषी जोडणीचे काम, शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न, पायाभूत विकासाची काम करणारे विभाग आणि कार्यालय यांच्या वीज जोडण्या लवकर करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच मेडा अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांना गती देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. सर्व लाभार्थ्यांना चांगल्या कामाचा व चांगल्या सेवेचा अनुभव यावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. पुराच्या दरम्यान झाडगावमध्ये एमएसईबीचे कार्यालय पुराच्या पाण्यात असताना सुद्धा तेथील कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले. भारताची वाटचाल विजेच्या तुटी कडून विजेची मुबलक उपलब्धता याकडे झालेली आहे. जे लक्ष ठेवलं होतं त्याकडे वाटचाल जोमाने चालू आहे. त्याचबरोबर वीज वितरण, पारेषण आणि महाजनकोने सर्वसामान्य नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा चांगल्या दर्जाच्या द्याव्यात असे आवाहन श्रीकृष्ण पांचाळ यांनी यावेळी केले. तसेच अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रावर भर देण्याची गरज त्यांनी यावेळी प्रतिपादिली. महोत्सवादरम्यान पथ नाट्य, आदिवासी नृत्य आणि ऊर्जा मंत्रालयाने तयार केलेल्या ऊर्जा विकासाशी संबंधित असलेल्या ७ चित्रफिती दाखविण्यात आल्यात. तसेच राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनेत लाभ घेतलेल्या २५ लाभधारकांना यावेळी सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिक्षक अभियंता महावितरण सुरेश मडावी यांनी केले,कार्यक्रमाचे सुत्र संचालन मांगीलाल राठोड, माधवी वानखडे यांनी केले तर आभार अधिक्षक अभियंता पारेषण सुनिल शेरेकर यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी