ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन 29 जूलै पर्यंत

यवतमाळ, दि २७ जिमाका:- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ या कार्यालयामार्फत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन 29 जूलै 2022 पर्यंत करण्यात आलेले आहे. स्थानिक पातळीवर तसेच इतर बाहेरील ठिकाणी औद्योगिक संस्थांना मनुष्यबळाची मागणी या कार्यालयाकडे आलेली आहे. सदर मागणीच्या अनुसरुन जिल्हयातील तसेच इतर ठिकाणच्या कंपनीशी संपर्क साधून एकूण 340 रिक्त पदांकरीता ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.यवतमाळ जिल्हयातील सर्व सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना या मेळाव्याचा ऑनलाईन पध्दतीने लाभ घ्यावा असे आवाहन या कार्यालयाच्या सहायक आयुक्त, श्रीमती विद्या शितोळे यांनी केले आहे. सदर मेळाव्याकरीता जिल्हयातील ईच्छुक उमेदवारांना rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार पसंतीक्रम देत सहभागी होता येणार आहे. सदर मेळाव्यामध्ये 10 वी, 12 वी, आय टी आय, पदविकाधारक, पधवीधर तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेले शैक्षणिक पात्रता व रिक्तपद निहाय रोजगार इच्छुक उमेदवारांना त्यांचेकडील सेवायोजन कार्ड ( एम्प्लॉएमेंट कार्ड ) चा युझरनेम व पासवर्डने लोगईन करुन सदर मेळाव्यामध्ये सहभागी होता येईल. सदर मेळाव्यास उद्योजकांकडून ऑनलाईन पध्दतीने मुलाखती / उमेदवारांशी प्रत्यक्ष संपर्क साधून रिक्तपदांकरीता निवड करण्यात येणार आहे. तरी यवतमाळ जिल्हयातील सर्व सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना या मेळाव्याचा ऑनलाईन पध्दतीने लाभ घ्यावा असे आवाहन या कार्यालयाच्या सहायक आयुक्त, श्रीमती विद्या शितोळे यांनी केले आहे. मेळाव्याकरीता ऑनलाईन पध्दतीने सहभागी होण्याची प्रक्रिया :- उमेदवारांकडे सेवायोजन कार्ड ( एम्प्लॉयमेंट कार्ड ) चा युझरनेम व पासवर्ड असणे आवश्यक आहे.नसल्यास rojgar.mahaswayam.gon.in या बेबपोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने कार्ड ची नोंदणी करता येइल. Job Seeker या टॅब मध्ये जावून लॉगकरुन डाव्या बाजूला पं. दिनदयाल उपाध्याय जॉब फेयर या वर क्लिक करावे. येथे यवतमाळ जिल्हा निवडून 29 जूलै दरम्यान रोजगार मेळाव्यामध्ये नोंदणीकृत उद्योजकांनी अधिसूचित केलेल्या रिक्तपदांच्या पसंतीक्रमानुसार अप्लाय या टॅब वर क्लिक करुन मेळाव्यामध्ये सहभागी होता येईल . या मेळाव्याचा अधिक माहितीकरीता 07232-2443952 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी