विधी सेवा प्राधिकरणातर्फे जिल्हा कारागृहात “प्लि बारगेनिंग” विषयावर मार्गदर्शन

यवतमाळ, दि 5 जुलै जिमाका :- विधी सेवा प्राधिकरणतर्फे 30 जून 2022 रोजी प्ली बारगेनिंग या विषयावर जिल्हा कारागृह, यवतमाळ येथे मार्गदर्शन करण्यात आले. सदर शिबीराच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम हे होते. प्रमुख अतिथी म्हणुन जिल्हा न्यायाधीश-1 ए.ए. लऊळकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. के. ए. नहार, हे होते. तर प्रमुख वक्ते म्हणुन पॅनल वकील अजय चमेडिया, तसेच मा. जिल्हा कारागृह अधिक्षिका किर्ती चिंतामणी, तुरुंगाधिकारी वर्ग-1 एस. पी. काळे हे उपस्थीत होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांनी जिल्हा कारागृहाला भेट देवून कैद्यांना काही अडचणी आहेत काय याबाबत विचारपुस केली. तसेच कायदेविषयक कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करतांना कैद्यांनी आयुष्यात चांगले कर्तव्य करावे, चुक झाली त्यात सुधारणा करता येते असे यावेळी त्यांनी सांगितले. जिल्हा व न्यायाधीश ए.ए. लऊळकर प्ली बारगेनिंग ही पध्दत बाहेर देशातुन आपण घेतलेली असून एखादया गुन्ह्यात जी शिक्षा आहे ती शिक्षा आरोपीने मान्य केल्यास त्या बदल्यात न्यायालयातर्फे शिक्षा कमी करता येते असे सांगितले. तर पॅनल वकील अजय चमेडिया यांनी प्ली बारगेनिंगबाबत विस्तृत माहिती देतांना या कायद्यांतर्गत लहान गुन्ह्यातील आरोपी हा न्यायालयासोबत वाटाघाटी करून शिक्षा कमी जास्त करू शकतो व वाटाघाटी फिसकटली तरी याचा बंद्याच्या केसवर काहीही परिणाम होणार नाही तसेच जे गुन्हे समाजाच्या विरोधात आहेत त्याल प्ली बारगेनिंग होत नसल्याचेही ॲड. चमेडीया यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन तुरंगाधिकारी अे.पी. काळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार जिल्हा कारागृह अधीक्षीका किर्ती चिंतामणी यांनी व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा कारागृहातील कैदी मोठ्या संख्येन उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी