शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश अर्ज स्विकारणे सुरु

यवतमाळ, दि 4 जुलै जिमाका :- सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरीता सामाजिक न्याय विभागचे मुला मुलींचे शासकीय वसतिगृहासाठीचे प्रवेश अर्ज स्विकारणे सुरू झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये सामाजिक न्याय विभागाचे एकुण 18 शासकीय वसतीगृह असुन यामध्ये 9 मुलांचे व 9 मुलींचे आहे. (स्थानिक यवतमाळ येथे 1 मुलांचे व 2 मुलींचे, मुलांचे वसतीगृह नेर 1, राळेगाव 1,घाटंजी 1,पांढरकवडा 1, वणी 1, उमरखेड 1,पुसद 1, ईसापुर - दिग्रस 1 व मुलींचे घाटंजी 1, वणी 1, आर्णी 1, पुसद 1, उमरखेड 1, दिग्रस 1,दारव्हा 1 असे एकुण 18 वसतीगृह) सदर मागासवर्गीय मुलां/मुलींचा सर्व शासकीय वसतीगृहामध्ये सन 22-23 करीता प्रवेशाची प्रकीया सुरु करण्यात आलेली आहे. ही प्रवेश प्रक्रीया पुर्वी प्रमाणेच ऑफलाईन पध्दतीने करण्यात येत आहे. वसतिगृहामध्ये विनामुल्य प्रवेश अर्ज वाटप करण्यात येत आहे. दि. 16 मे 2012 चे शासन निर्णयानुसार गुणवत्तेनुसार वसतिगृह/कार्यालयामध्ये प्रवेश यादी प्रसिध्द करण्यात येईल. शालेय विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन अर्ज करण्याचा कालावधी 15 जुलै पर्यंत आहे. इयत्ता 10 वी व 11 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळुन) 30 जुलै तर बी.ए./बी.कॉम/बी.एस्सी. अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदविका /पदवी आणि एम.ए./एम.कॉम./एम.एस्सी. असे पदवी नंतरचे पदव्युत्तर, पदवी, पदवीका इत्यादी अभ्यासक्रमाती विद्यार्थ्यांसाठी 24 ऑगस्ट तर व्यावयायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी 30 सप्टेंबर 2022 ही अर्ज करण्याची अंतिम दिनांक राहील. वसतीगृहातील प्रवेशाच्या जागा रिक्त राहिल्यास प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देऊन तात्काळ त्याच दिवशी वसतीगृहात प्रवेश देण्यात येईल असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी