यांचे रोजगार मेळाव्यातील उमेदवारांना आवाहनध्येय गाठण्यासाठी छोट्या संधीचे रूपांतर मोठ्या संधीत करावे जिल्हाधिकारी अमोल येडगे

यवतमाळ, दि 7 जुलै जिमाका :- बेरोजगार उमेदवारांनी रोजगार मेळाव्यामधून प्राप्त होणाऱ्या नोकरीत मेहनत व जिद्दीने ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करावे आणि आपले मोठे ध्येय गाठण्यासाठी या छोट्या संधीचे रूपांतर मोठ्या संधीत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी रोजगार मेळाव्यातील उमेदवारांना केले. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी यांचे संयुक्त विद्यमाने आज वणी येथे पंडित दिनदयाल उपाध्याय भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. कार्यक्रमाला खासदार बाळू धानोरकर, आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तुकाराम कोंगरे, बँकेचे उपाध्यक्ष संजय दरेकर लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसाद खानझोडे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त विद्या शितोळे प्रामुख्याने उपस्थित होते. खासदार बाळू धानोरकर यांनी बेरोजगार उमेदवारांनी नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगारातून नोकरी देणारे बना असे आवाहन केले. तर आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी रोजगार मेळाव्याकरिता उपस्थित उमेदवारांना आपले कौशल्य विकसित करून व प्राविण्याच्या जोरावर पुढे जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त विद्या शितोळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकेतून रोजगार मेळाव्याची माहिती दिली. आजच्या रोजगार मेळाव्यात महिंद्रा ॲण्ड महिंद्रा औरंगाबाद व पूणे, टिव्हिएस चेन सप्लाय ग्रूप, पुणे, व्हेराक इंजिनिअरींग, वाळुज, डुरेव्हॉल्स औरंगाबाद,सारा स्पिंटेक्स यवतमाळ, तिरुमला इंडस्ट्रिएल ॲण्ड अलाईड प्रा.लि. धृत ट्रान्समिशन औरंगाबाद, देवगिरी फॉरगिव्हींगस औरंगाबाद, मस्कार पिसीझन औरंगाबाद, ईशान मिनरल्स, वणी, जय ॲग्रो इंडस्ट्रिज, लोहारा यवतमाळ इत्यादी विविध नामांकित कंपण्याकडुन उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. रोजगार मेळाव्यात एकूण 362 उमेदवारांनी सहभाग नोंदवला त्यापैकी 116 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी