वणी येथे 7 जुलै रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

यवतमाळ, दि 5 जुलै जिमाका :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी यांचे संयुक्त विद्यमाने 7 जुलै 2022 रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर रोजगार मेळाव्या करीता एकूण 2362 रिक्तपदे अधिसुचित करण्यात आली आहे. सदरची रिक्तपदे ही महिंद्रा ॲण्ड महिंद्रा औरंगाबाद व पूणे, टिव्हिएस चेन सप्लाय ग्रूप, पुणे, व्हेराक इंजिनिअरींग, वाळुज, डुरेव्हॉल्स औरंगाबाद,सारा स्पिंटेक्स यवतमाळ, तिरुमला इंडस्ट्रिएल ॲण्ड अलाईड प्रा.लि. धृत ट्रान्समिशन औरंगाबाद, देवगिरी फॉरगिव्हींगस औरंगाबाद, मस्कार पिसीझन औरंगाबाद, ईशान मिनरल्स, वणी, जय ॲग्रो इंडस्ट्रिज, लोहारा यवतमाळ इत्यादी विविध नामांकित कंपण्याकडुन प्राप्त करण्यात आली असुन रोजगार मेळाव्याचे दिवशी सदर कंपनीचे अधिकारी उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहे. सदर मेळाव्यामध्ये 10वी, 12वी, आय.टि.आय., पदविकाधारक, पदवीधर तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रम पुर्ण केलेले ईच्छुक उमेदवारांना रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहुन या संधी लाभ घेता येणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी या मेळाव्यामध्ये सहभाग नोंदविणे करीता https://forms.gle/Us२RomwjVikPdGjw७ या गुगल लिंकचा वापर करावा व प्रत्यक्ष मेळाव्याचे ठिकाणी म्हणजेच लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी येथे दिनांक 7 जुलै 2022 रोजी मुलाखती करीता उपस्थित राहावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त विद्या शितोळे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी