कोविड मुळे पालक दगावलेल्या बालकांना शैक्षणिक खर्चासाठी बालन्याय निधीद्वारे आर्थिक मदत

यवतमाळ, दि 19 जुलै (जिमाका) :- कोविड आजारामुळे अनेकांनी आपले जवळचे व्यक्ती गमावले असून त्यात यवतमाळ जिल्ह्यातील 516 बालकांनी आई किंवा वडील कोविड मुळे गमावले आहेत, यातील 12 बालके असे आहेत कि ज्यांनी आई-वडील दोन्ही कोविड मुळे गमावले आहे. यातील 18 वर्षाआतील व सहा वर्षावरील बालकांना सहाय्य म्हणून शासनाद्वारे विविध योजनांचा लाभ दिल्या जात आहे. याचाच एक भाग म्हणून महिला व बाल विकास विभागाद्वारे बाल न्याय निधी जिल्ह्यास उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. या अंतर्गत शालेय शुल्क, वसतिगृह शुल्क व शालेय साहित्य खरेदी करीता 181 बालकांना आर्थिक मदत केल्या गेली. या अंतर्गत 18 लाख एक हजार निधी बालकांच्या बँक खात्यात वितरीत करण्यात आलेला आहे. या योजनेचा लाभ देण्यात आलेल्या लाभार्थीची यादी जिल्हा बाल संरक्षण कक्ष येथे तसेच घेण्याकरीता तालुक्यातील मिशन वात्सल्य समितीकडे तहसील कार्यालय, बाल विकास प्रकल्प अधिकारी व तालुका संरक्षण अधिकारी यांचे कडे विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रासह अर्ज करावा. जिल्हा कृती दल मार्फत अर्जाची तपासणी करुन उर्वरित गरजू बालकांना लाभ दिल्या जाणार आहे. पहिल्या टप्प्यात बाल न्याय निधी अंतर्गत लाभ देण्यात आलेल्या लाभार्थी यांची यादी ही जिल्हा बाल संरक्षण कक्ष येथे व www.yavatmal.gov.in या यवतमाळ जिल्ह्याच्या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. बाल न्याय निधी द्वारे कोविडमुळे अनाथ व निराधार झालेल्या बालकांना शैक्षणिक शुल्क व शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी मदत केल्या जाणार आहे. या मदतीचा गरजू बालकांना निश्चित लाभ होणार आहे. त्यामुळे कोविड-19 मुळे एक किंवा दोन्ही पालक दगावलेल्या गरजू बालकांनी त्वरित अर्ज दाखल करावे व अधिक माहिती करीता जिल्हा बाल संरक्षण कक्ष, दगडी इमारत, टांगा चौक-यवतमाळ येथे संपर्क साधावा असे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजुरकर यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी