सर्व खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनानी ई-आर 1 सादर करण्यासाठी ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा

यवतमाळ, दि. 20 जुलै (जिमाका) :- कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांच्याकडून पुरविण्यात येणाऱ्या रोजगार विषयक सर्व सेवा आत्ता ऑनलाइन करण्यात आलेल्या आहेत. या सुविधा ऑनलाईन पध्दतीने पुरविण्यात येतात. त्यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. तसेच उद्योजक / आस्थापना यांनी सेवायोजना कार्यालय ( रिक्त पदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारा कायदा 1959) अन्वये त्रैमासिक ई-आर 1 ऑनलाइन सादर करणे बंधनकारक आहे. जून-2022 अखेर संपणाऱ्या त्रैमासिक करिता ई-आर-1 या प्रपत्राची माहिती वरिल संकेतस्थळावर सर्व शासकीय/ निमशासकीय /खाजगी उद्योजक / आस्थापना यांनी त्यांचे युजर आयडी व पासवर्डच्या माध्यमातून लॉगिन करुन ऑनलाइन सादर करावयाची आहे, व त्याबाबतचे प्रमाणपत्र संकेतस्थळावरुन प्राप्त करुन घ्यावयाचे आहे. ऑनलाईन ई-आर 1 सादर करताना काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ या कार्यालयाशी व ०७२३२-२४४३९५ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. ई-आर 1 सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलै,2022 आहे. ई-आर 1 ऑनलाइन सादर न करणाऱ्या कसुरदार आस्थापनावर विहित नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यास सहायक आयुक्त विद्या शितोळे, यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी