जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत 13 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोक अदालत

यवतमाळ, दि. 20 जुलै (जिमाका) :- यवतमाळ जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांच्या मार्गदर्शनात दिनांक 13 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित असलेले तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, भुअर्जन मामल्याची प्रकरणे, महसुली प्रकरणे, वैवाहीक संबंधातील वाद प्रकरणे, बँका व अन्य वित्तीय संस्थांचे नुकसान व वसुली प्रकरणे, तडजोडीस पात्र असणारी सर्व प्रलंबित व दाखलपुर्व प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहे. लोकअदालतीमध्ये वाद मिटविण्याकरिता न्यायाधीश, तज्ज्ञ वकील व सामाजिक कार्यकर्ते यांचे मंडळ पक्षकारांना मदत करेल तसेच यासाठी पक्षकारांना कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही. तरी संबधीत पक्षकारांनी आपली प्रकरणे दिनांक 13 ऑगस्ट 2022 रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ठेवण्याकरीता संबधीत न्यायालयात अर्ज सादर करावा आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ तसेच जिल्ह्यातील इतर तालुका विधी सेवा समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधून आपली जास्तीत जास्त प्रकरणे आपसी तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव के.ए.नहार यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी