जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2022

69 जागांसाठी आरक्षण जाहीर 35 जागांवर महिलांची लागणार वर्णी हरकती व आक्षेप घेण्यास २ ऑगस्टपर्यंत मुदत यवतमाळ दिनांक 28 जुलै जिमाका: - जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेच्या 69 जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले यातिल ३५ जागा महिलांना राखिव ठेव्ण्यात आल्या. यामध्ये अनुसूचित जाती 8, अनुसूचित जमाती 15, नागरिकांचा मागास प्रवर्ग 11, आणि सर्वसाधारण 35 जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. तसेच प्रत्येक आरक्षणामध्ये 50 टक्के आरक्षण महिलांसाठी राखिव करण्यात आले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली आणि निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बचतभवन येथे सोडत काढण्यात आली. जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण जागांपैकी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा आरक्षित ठेवण्यात येतात. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 9 जुलै 2007 रोजी दिलेल्या एका निर्णयानुसार सदर आरक्षण चक्राणूक्रमे फिरविण्यात येते. आरक्षण चक्राणूक्रमे फिरविण्याच्या प्रयोजनात सन 20122 मध्ये होणारी जिल्हा परिषद व पंचायत समितीची ही पाचवी निवडणूक आहे. त्यामुळे सन 2002, 2007, 2012 व 2017 मध्ये असलेले निवडणूक विभाग व निर्वाचक विभागाचे आरक्षण विचारात घेऊन या निवडणुकीमध्ये आरक्षण चक्राणूक्रमे फिरविण्यात आले. जिथे चक्राणुक्रमे फिरविण्यास वाव नव्हता तिथे ईश्वर चिठ्ठिने आरक्षणाची सोडत काढण्यात आली. सन 2022 च्या जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आरक्षण सोबत जोडलेल्या यादी प्रामाणे राहिल.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी