शैक्षणिक प्रगतीसाठी विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे महत्वाचे शालेय आरोग्य कार्यक्रम गंभिरतेने राबविण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सूचना

यवतमाळ, दि 11 जुलै जिमाका :- विद्यार्थ्यांच्या शारिरिक आरोग्याचा परिणाम त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवरदेखील होत असतो, तसेच शैक्षणिक क्षेत्रात कमी कार्यक्षमतेच्या यादीत जिल्ह्याचा समावेश असल्यामुळे यवतमाळ जिल्ह्याचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी आरोग्य व शिक्षण विभाग यांनी आपसी समन्वयातून शालेय आरोग्य कार्यक्रम गंभिरतेने राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा आरोग्य अधिकारी प्रल्हाद चव्हाण, माता व बाल संगोपान अधिकारी संजीवकुमार पांचाळ, डायटचे प्राचार्य प्रशांत गावंडे, महिला व बाल कल्याण अधिकारी ज्योती कडू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, प्रशांत पाटील, प्रिती दुधे प्रामुख्याने उपस्थित होते. शालेय आरोग्य कार्यक्रमांतर्गत इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वयानुरूप आरोग्य शिक्षण, आरोग्य प्रोत्साहन उपक्रम, आरोग्य तपासणीस प्रोत्साहन, आपत्कालीन काळजीसाठी आवश्यक कौशल्ये, आजाराचे लवकर निदान व उपचार, शाळांमध्ये पिण्यायोग्य पाण्याचा वापर, मासिक पाळीच्या स्वच्छतेसाठी प्रोत्साहन, योग आणि ध्यान धारणेस प्रोत्साहन, आरोग्य वर्धन पोषण यावर संशोधनास प्रोत्साहन यासोबतच बालविवाह व पोक्सो कायद्याची माहिती, लैंगिक शिक्षण, गुड टच बॅड टच याबाबत माहिती द्यावी. यासाठी संपुर्ण जिल्ह्यातील आश्रम शाळा, माध्यमीक शाळा, विद्यार्थी संख्या जास्त असलेल्या मोठ्या संस्थेत पोहचण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शिक्षण विभाग व आरोग्य विभागाला दिल्या. बैठकीला संबंधीत आरोग्य, शिक्षण, महिला व बालविकास विभागाचे तसेच इतर संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी