'आकाशवाणी संगे, ऐकू गाथा विकासाची' जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतिने दर मंगळवारी सकाळी आठ वाजता प्रसारित होईल

Ø श्रोत्यांनी लाभ घेण्याचे आवाहन यवतमाळ, दि 6 जुलै (जिमाका) :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाच्या वतीने यवतमाळ आकाशवाणीवर 'आकाशवाणी संगे, ऐकू गाथा विकासाची' हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध विभागांच्या योजनांची माहिती त्या - त्या विभागाचे अधिकारी यवतमाळ आकाशवाणीवर मुलाखतीच्या माध्यमातून देणार आहेत. प्रत्येक मंगळवारी सकाळी ८ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. यामध्ये पशुसन्वर्धन, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विकास विभाग, कृषि विभाग, महिला व बाल विकास विभाग, समाजकल्याण, सहकार विभाग, जिल्हा उद्योग केन्द्र, कामगार विभाग, तसेच जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, आदी अधिकाऱ्यांच्या मुलाखती प्रसारित होतील. श्रोत्यांनी हा कार्यक्रम निश्चित ऐकावा, असे अवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी