डाक विभागाकडून दीनदयाळ स्पर्श योजनेत फिलाटेली शिष्यवृत्ती

यवतमाळ:- विद्यार्थ्यांमध्ये टपाल तिकिटे जमविणे आणि तिकीटांचे संशोधन करण्याचा छंद निर्माण करणे या हेतूने भारतीय टपाल खात्यामार्फत ईयत्ता 6 वी ते ईयत्ता 9 वीच्या विदयार्थ्यांकरिता “दीनदयाळ स्पर्श योजना” या नावाने फिलाटेली शिष्यवृत्ती सुरु केलेली आहे. निवड झालेल्या विदयार्थ्यांना वार्षिक 6000/- शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. टपाल तिकीट संग्रह करण्याच्या छंदातून, विदयार्थ्यांना त्या त्या वेळच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय तसेच सांस्कृतिक जडणघडणीचा अभ्यास करण्यास मदत होते. तसेच ज्या विषयावर टपाल तिकीट काढले गेले आहे त्या विषयाचा सखोल अभ्यास करण्याची जिद्द निर्माण होते. ज्या विदयार्थ्यांनी तिकिटे जमविणे आणि संशोधन करण्याचा छंद जोपासला आहे, अशा विदयार्थ्यांची टपाल खात्याकडून फिलाटेली प्रश्नमंजुषा आणि फिलाटेली प्रकल्प या आधारावर, मुख्य पोस्ट मास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई या कार्यालयातर्फे निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या विदयार्थ्यांना वार्षिक 6000/- शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. याकरिता विदयार्थ्यांकडे फिलाटेली अकाऊंट असणे किंवा विद्यार्थी फिलाटेली क्लब चा सदस्य असणे आवश्यक आहे. शिष्यवृत्ती योजनेत सहभागी होण्याचा कालावधी 01 ते 31 ऑगस्ट हा असेल. विदयार्थ्यांमध्ये टपाल तिकीट संग्रहाचा छंद निर्माण व्हावा आणि त्यातून आपला सांस्कृतिक वारसा जपला जावा याकरिता मोठया संख्येने या योजनेत सहभाग नोंदवावा. तसेच यवतमाळ जिल्हयातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी या शिष्यवृत्ती योजनेत विदयार्थ्यांना, सहभागी होण्याकरिता प्रोत्साहित करावे, असे आवाहन श्री. के. एन. बावनकुळे, अधिक्षक डाकघर, यवतमाळ विभाग, यवतमाळ यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी