कृषि विज्ञान केंद्र,यवतमाळ येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

यवतमाळ दि,२६ जुलै जिमाका:- कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ (डॉ पं .दे.कृ.वि., अकोला ) व ॲफ्रो, यवतमाळ आणि प्रोसॉईल प्रकल्प,मॅनेज, हैद्राबाद यांचे विद्यमाने कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यक्रम समन्वयक डॉ. सुरेश नेमाडे तसेच डॉ. पं.दे.कृ.वी.कापूस संशोधन केंद्र सहयोगी प्राध्यापक, डॉ. संजय काकडे, डॉ. भगवान सोनवणे, सहायकप्राध्यापक, मृदाशास्त्र विधाग डॉ. पं.दे.कृ.वी.,अकोला, डॉ. पी. यु. घाटोळे,प्रभारी ॲटिक सेंटर, डॉ.पं.दे.कृ.वी.,अकोला, डॉ. आर. एस. वानखेडे, सहाय्यक प्रा. कृषी संशोधन केंद्र,अचलपूर (डॉ. पं.दे.कृ.वी.,अकोला), डॉ. मिलिंद साबळे, अधिकारी, ॲफ्रो, यवतमाळ, व्ही. एस. ठोकरे,अधिकारी, ॲफ्रो, गजेंद्र चवळे, अधिकारी, ॲफ्रो, यवतमाळ, अमित बोरकर, अधिकारी, प्रोसॉईलप्रकल्प, मॅनेज, हैद्राबाद इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. तसेच कृषी विज्ञान केंद्र ,यवतमाळ चे डॉ. सुकेशनीवाणे, शास्त्रज्ञ, कृषीअभियांत्रिकी , डॉ. प्रमोद मगर, शास्त्रज्ञ, कीटकशास्त्र, श्री. मयूर ढोले, शास्त्रज्ञ,विस्तारशिक्षण, श्रीमती स्नेहलताभागवत, शास्त्रज्ञ, गृह विज्ञान इ. शास्त्रज्ञ उपस्थित होते. डॉ. सुरेश नेमाडे यांनी प्रोसॉईलप्रकल्प अंतर्गत संभाव्य वातावरण बदलानुरूप व सध्या परिस्थितीनुसार तज्ञाकडून वेळोवेळी सल्ल्यानुसार मार्गदर्शन केले जाते. तरी या प्रणालीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे अवाहन केले. सध्याच्या पिक परिस्थितीनुसार शेतकरी बांधवांनी कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञाच्या संपर्कात राहून वेळोवेळी मार्गदर्शन घ्यावे अशी विंनती केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित बोरकर, अधिकारी, प्रोसॉईल प्रकल्प, मॅनेज, हैद्राबाद यांनी राबवत असलेल्या प्रोसॉईल प्रकल्पाचे महत्त्व व उद्देश विषद केले. कार्यक्रमाच्या तांत्रिक सत्रामध्ये डॉ. संजय काकडे, सहयोगी प्राध्यापक, कापूस संशोधन केंद्र, डॉ.पं.दे.कृ.वी.,अकोला यांनी खरीप हंगामातील माती परीक्षण आधारित खत व्यवस्थापन व खरीप हंगामातील तणव्यवस्थापन या विषयी सखोल मार्गदर्शन केले. डॉ. भगवान सोनवणे, सहायक प्राध्यापक, मृदाशास्त्र विधाग डॉ. पं.दे.कृ.वी.,अकोला यांनी पिकाचेउत्पादन वाढीसाठी सेंद्रिय खताचे महत्त्व व पिकांची फेरपालट या विषयी मनोगत व्यक्त केले. डॉ. पी. यु. घाटोळे, प्रभारी ॲटिक सेंटर, डॉ. पं.दे.कृ.वी.,अकोला यांनी ॲटिक सेंटर अंतर्गत विद्यापीठाचा टोलफ्री १८००२३३ ०७२४ प्रणालीवर जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी संपर्क साधून आपल्या कृषी विषयक शंकाचे निरासरण करावे अशी विनंती केली. डॉ. आर. एस. वानखेडे, सहाय्यक प्रा. कृषी संशोधन केंद्र, अचलपूर (डॉ. पं.दे.कृ.वी.,अकोला ) यांनी सुधारीत फळबाग लागवड तंत्रज्ञाना विषयी सखोल मार्गदर्शन केले. डॉ. प्रमोद मगर, शास्त्रज्ञ,कीटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी कापूस पिकातील कमी खर्चिक खरीप हंगामातील कीड व रोग व्यवस्थापन तर डॉ. मिलिंद साबळे, अधिकारी, ॲफ्रो, यवतमाळ यांनी ॲफ्रो प्रकल्पाअंतर्गत राबवीतअसलेल्या उपक्रमाचा उहापोह केला . कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ व ॲफ्रो प्रकल्पाचे अधिकारी,कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शास्त्रज्ञ, विस्तार शिक्षण कृषी विज्ञान केंद्र,मयूर ढोले,तर आभार प्रदर्शन विशाल राठोड , सहायक ,प्रयोगशाळा कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी