महिलांनी शासनाच्या नि:शुल्क संगणक प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

· कौशल्य विकासद्वारे “ॲडव्हांस डिप्लोमा इन सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग” प्रशिक्षण · अमरावती येथे देणार महिलांसाठी 18 महिन्यांचे नि:शुल्क निवासी प्रशिक्षण · आय.टी.आय. व आश्रम शाळेच्या प्राचार्यांनी पुर्वपरिक्षेसाठी मार्गदर्शन करावे यवतमाळ, दि 15 जुलै (जिमाका) :- रोजगार मिळविण्यासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेणे ही काळाची गरज आहे. यासाठी कौशल्य विकास विभागाद्वारे ‘आकांक्षा’ कार्यक्रमांतर्गत आयोजित “ॲडव्हांस डिप्लोमा इन सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग” या नि:शुल्क प्रशिक्षणात जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होवून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. महिला व युवतींकरिता आयोजित निवासी प्रशिक्षणासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे, तसेच सर्व आय.टी.आय., आश्रम शाळा, व माध्यमीक शाळांचे प्राचार्य उपस्थित होते. संगणक प्रशिक्षण योजनेचा लाभ यवतमाळ जिल्ह्यातील बहुसंख्या महिलांना मिळावा यासाठी आय.टी.आय., तंत्रनिकेतन, आश्रम शाळेच्या प्राचार्यांनी विद्यार्थीनींना पुर्व परिक्षेबाबत मार्गदर्शन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. कौशल्य विकास विभाग आणि नवगुरूकुल फाऊंडेशन फॉर सोशल वेलफेअर यांच्या माध्यमातून या प्रशिक्षणाचे आयोजन अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी येथे करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण केवळ महिलांकरिता असून त्यांच्या प्रशिक्षण, निवास व भोजनाची व्यवस्था नि:शुल्क करण्यात आली आहे. प्रशिक्षणाचा कालावधी 18 महिने पर्यत असणार आहे. प्रशिक्षणात प्रवेश घेण्यासाठी महिलांचे वय 17 ते 28 वर्षे असावे व किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास (विज्ञान, कला, वाणिज्य) किंवा आय.टी.आय. किंवा तंत्रनिकेतन पदवीका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या महिलांना नामांकित कंपनी, स्टार्टअप मध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. प्रवेश परिक्षेसाठी नोंदणी सुरु असून प्रवेशाकरिता ऑनलाईन, ऑफलाईन परिक्षा घेण्यात येणार आहे. ऑनलाईन परिक्षा 10 ते 30 जुलै 2022 पर्यंत देता येणार असून ऑफलाईन परिक्षा 10 ऑगस्ट 2022 रोजी शासकीय आय.टी.आय. यवतमाळ येथे घेण्यात येणार आहे. प्रवेश परिक्षेमध्ये इयत्ता सहावीपर्यंतचे इंग्लिश व इयत्ता आठवीपर्यंतचे गणित तसेच मुलाखत आदी घटकांचा समावेश असणार आहे. नोंदणी करण्यासाठी http://bitly.ws/sAa८ या लिंक वर अर्ज करावा. अधिक माहितीसाठी www.navgurukul.org अथवा http://kaushalya.mahaswayam.gov.in किंवा राज्यस्तरीय समन्वयक दुरध्वनी 8879585123 अथवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयात संपर्क करावा, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी