अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी 23 जुलै पर्यंत अर्ज सादर करा

यवतमाळ, दि 12 जुलै जिमाका :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ कार्यालयामार्फत सन 2021-22 या शैक्षणीक वर्षात दहावी, बारावी, वैद्यकीय व अभियांत्रीकी पदवी इत्यादी अभ्यास क्रमात 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त प्राविण्याने गुणवत्ता मिळवुन उर्तीण झालेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थी / विद्यार्थींनीना महामंडळाकडुन जेष्ठता व गुण क्रंमाकानुसार उपलब्ध निधिच्या आधीन राहुन अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती मंजुर करण्यात येते. करिता मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थी / विद्यार्थींनी यांनी जिल्हा कार्यालय, डॉ. बाबाबसाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पळसवाडी कॅम्प, दारव्हा रोड यवतमाळ येथे संपर्क साधुन , दि.23 जुलै 2022 पर्यंत अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती अर्ज करावे, असे जिल्हा व्यवस्थापक यवतमाळ यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी