पिक विमा योजनेत जास्तित जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी

1 लक्ष 64 हजार 274 शेतकऱ्यांना उतरविला पिक विमा यवतमाळ दि 26 जुलै जिमाका:- जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पुर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाची नुकसान भरपाई मिळण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने पिक विमा योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील प्रधानमंत्री पिक विमा योजनेची बैठक पार पडली, यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले. प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी विमा कंपनीने तालुका व जिल्हास्तरावर कार्यालय त्वरित सुरू करावे. मागील वर्षातील व या वर्षातील शेतकऱ्यांच्या पिक विमा बाबत तक्रारींचे कंपनीने निराकरण करावे असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लक्ष 64 हजार 274 शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभाग नोंदविला आहे. जिल्ह्यातील यावर्षीची पूर परिस्थिती आणि पिकांची परिस्थिती बघता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभागी व्हावे असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती