मुरघास निर्मिती युनिटकरीता अर्थसहाय्य

यवतमाळ, दि 26 जुलै :- जिल्हयाकरीता राष्ट्रीय पशुधन अभियाना अंतर्गत मुरघास निर्मिती करीता सायलेज बेलर मशिन युनिट स्थापन करण्यात येणार आहे. या मशिनसाठी जिल्हयातील सहकारी दूधउत्पादक संघ/संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, स्वयंसहायता बचत गट व गोशाळा / पांजरपोळ संस्था यांना सदर योजनेसाठी अर्थसहाय्य मिळणार आहे. या योजनेसाठी प्रती युनिट 20 लाख रुपये खर्चापैकी 50 टक्के 10 लक्ष रुपये केंद्र शासनाचे अर्थ सहाय्य राहणार आहे. उर्वरीत 50 टक्के 10 लक्ष रुपये संस्थेने स्वत: खर्च करावयाचे आहे. सदरचा निधी हा जनजाती क्षेत्र उपयोजनेतील असुन जनजाती क्षेत्र (अनुसूचितजमाती) प्रवर्गातील लाभार्थींसाठी असल्याने योजनेकरीता जिल्हयामध्ये एक युनिट स्थापनकरावयाचे आहे. तरी जनजाती क्षेत्र (अनुसूचित जमाती) प्रवर्गातील संस्थांनीच 29 जुलै 2022 पर्यंत अर्ज सादर करावे. अर्ज पंचायत संमिती कार्यालयात उपलब्ध आहे, तरी पात्र संस्थांनी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, डॉ. एम.यु. गोहोत्रे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी