प्रशासनाने 17 वर्षीय मुलाचा थांबविला बालविवाह

यवतमाळ, दि 12 जुलै जिमाका :- बाभूळगाव तालुक्यातील करळगाव येथे 17 वर्षीय अल्पवीन बालकाचा बालविवाह होत असलेबाबत माहिती मिळताच जिल्हा बाल संरक्षण कार्यालयाने तातडीने सदर बालविवाह थांबविला. बाल संरक्षण कक्षाला गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे माहिती विश्लेषक सुनील बोक्से यांनी तातडीने करळगाव ता. बाभूळगाव या गावी भेट दिली. जिल्हा बाल संरक्षण कक्षाद्वारे ग्रामीण पोलीस स्टेशन यवतमाळ, व चाईल्ड लाईन १०९८ यवतमाळ यांना बालविवाह बाबत माहिती देण्यात आली. अल्पवयीन बालकाच्या कुटुंबास प्रत्यक्ष भेट देऊन बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ व बालविवाह झाल्यास बाल विवाह प्रतीबंधक अधिनियम २००६ अंतर्गत शिक्षेस पात्र होऊ शकते अशी माहिती देण्यात आली. सदर बालकाच्या आई वडिलांकडून बालकाचा विवाह २१ वर्ष पूर्ण झालेनंतरच करण्यात यावा असा जवाब लिहून घेण्यात आला व त्याप्रमाणे सुचना पत्र सुद्धा देण्यात आले. सदर बालविवाह थांबविण्यास ग्रामीण पोलीस स्टेशन यवतमाळ चे पोलीस उपनिरीक्षक अमोल ढोकणे, पोलीस उपनिरीक्षक सुजाता मनवर, सहायक पोलीस उपनिरीक्षक रणजीत जाधव, पोलीस कर्मचारी रुपेश नेवारे, चाईल्ड लाईन टीम मेंबर दिलीप दाभाडेकर, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे माहिती विश्लेषक सुनील बोक्से, गावातील पोलीस पाटील प्रज्ञा बन्सोड, आशा वर्कर रंजना नाईक याच्या उपस्थितीत कार्यवाही करण्यात आली. सदर कार्यवाहीस जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी