अतिवृष्टीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी ऑनफिल्ड

राळेगाव व कळंब तालुक्यात केली पाहणी यवतमाळ, दि 18 जुलै (जिमाका) :- राळेगाव व कळंब तालुक्यात काल मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती त्याची दखल घेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ऑनफिल्ड जाऊन अतिवृष्टी व पूर परिस्थितीची पाहणी केली. या दोन्ही तालुक्यातील सावंगी पेरका, झाडगाव, कात्री, कामठवाडा, या गावातील तसेच कळंब येथील चक्रावर्ती नदीकाठच्या पूर बाधीत नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच रामतीर्थ गावातील नदीच्या पाणी पातळीचे अवलोकन करून प्रशासनाला योग्य दक्षता घेण्याबाबत व आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. याप्रसंगी त्यांचेसमवेत उपविभागीय अधिकारी शैलेश काळे हे देखील उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय राळेगाव येथे सर्व तालुका स्तरीय विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेवून अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. पिक विमा साठी जास्तीत जास्त अर्ज घेण्याचे, पिण्याच्या पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवण्याचे व डायरीया, कॉलरा, मलेरिया, डेंगू होऊ पसरणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. बैठकीला संबंधीत तहसिलदार, तालुका कृषी अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी, पोलीस अधिकारी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी