अनेकदा समाजात दारू आणि तंबाखू हेच अमली पदार्थ आहे असं समजलं जातं. परंतु आज समाजामध्ये भांग, गांजा, चरस, हीरोइन, एम.डी. पावडर यासारखे अमली पदार्थ आपल्या तरुणांच्या रक्तामध्ये दिसून पडतात. 26 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिवस. यानिमित्त अमली पदार्थाच्या सेवनामुळे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक व आर्थिक दुष्परिणाम आणि व्यसमुक्तीची माहिती. किशोरवयाच्या उंबरठ्यावर प्रत्येक जण शारीरिक, भावनिक व मानसिक स्तरावर एका नव्या परिस्थितीचा अनुभव करत असतो. हे वय म्हणजे पाण्याच्या प्रवाहासारखे असतं. आयुष्याचा प्रत्येक क्षण उत्साहात, उमेदीत तर कधी उन्मादात व्यतीत होत असतो. किशोर वयामध्ये नवीन प्रयोग करण्याचे, धोके पत्करण्याची मानसिकता तरुणांमध्ये असते. कधी पार्टीच्या निमित्ताने, तर कधी मित्राच्या दबावाखाली, सहजच उत्सुकता म्हणून अथवा सिनेमातील हीरो हीरोइन चे अनुकरण करून तरूणाई एखाद्या अंमली पदार्थाचे सेवन करत व्यसनाधीन होतात. तारुण्याचे अमृत प्राशन करत असतांना कळत-नकळत व्यसनाचा प्याला हातात येतो. मग पुष्कळदा मानसिक तणाव, उदासीनता, याच्या प्रभावाखाली किंवा उत्साह वाढवण्यासाठी या पदा...
Comments
Post a Comment