सर्पमित्र व स्वयंसेवी वन्यजीव रक्षक यांची नांवे नोंदणी करणे अनिवार्य

यवतमाळ, दि 5 जुलै जिमाका :- यवतमाळ वन विभागा अंतर्गत शासनाने नियुक्त मानद वन्यजीव रक्षक श्याम जोशी, (मो. नं. ९९६०१५६८८६) यांनी शिफारस केलेल्या सर्पमित्र व स्वयंसेवी वन्यजीव रक्षकांनी वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय येथे जावून त्यांचे व त्यांच्या चमु मधील सर्व सदस्यांची नांवे नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच सर्पमित्रांकडून सोशल मीडिया व प्रसिध्दीच्या नादामध्ये सापांशी वा वन्यजीवांशी खेळ करणे, स्टंटबाजी करणे, असे प्रकार होतात, यात बहुतेकांचा जीव सुध्दा गेलेला आहे. तसेच साप पकडल्यानंतर नैसर्गिक अधिवासात न सोडता बंदिवासात मध्ये ठेवले जातात. तर काही सर्पमित्र साप पकडण्याचा मोबदला म्हणून नागरिकांकडून पैशाची मागणी देखील करु लागले आहेत. काही सर्पमित्रांनी सापांच्या विषाची तस्करी केल्याचे सुध्दा उघडकीस झालेले आहे. तरी याप्रकारच्या बाबी निदर्शनास आल्यास संबंधीतांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल याची सर्व सर्पमित्र यांनी नोंद घ्यावी, असे उपवनसरंक्षक आनंद रेड्डी येल्लु यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी