विद्यार्थ्यांनी जात पडताळणीचे प्रस्ताव सादर करावे

यवतमाळ, दि 12 जुलै जिमाका :- सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात १२ वी विज्ञान तसेच वैद्यकीय, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र व औषधनिर्माण शास्त्र या व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यास ईच्छुक विद्यार्थ्यांनी आपल्या जाती प्रमाणपत्राची पडताळणी करण्याकरीता आपला अर्ज https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरावा. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट व त्यासोबत आवश्यक सर्व मुळ कागदपत्रासह जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, यवतमाळ या कार्यालयाकडे दिनांक ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत सादर करावे. सन २०२२-२३ मध्ये आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यायार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यानंतर सामान्यत: ३ महिन्यांच्या आत वैधता प्रमाणपत्र देण्यात येते. वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जात वैधता प्रमाणपत्रा अभावी यवतमाळ जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थी, व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्यापासुन वंचित राहु नये, यास्तव ज्या मागासवर्गीय विद्यार्थींनी अद्यापही वैधाता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर केलेले नाही, त्यानी जिल्हा जात प्रमाणपत्र समिती, यवतमाळ या समितीकडे दिनांक ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज दाखल करावा. समिती कार्यालयातर्फे जुन २०२२ पर्यंत प्राप्त विद्यार्थांच्या प्रकरणात निर्णय घेण्यात आला असून अर्जदारांनी https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र त्यांनी अर्जात नमुद केलेला ई-मेलवर प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळाणी समितीचे उपायुक्त दिलीप राठोड यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी