प्रस्तावीत स्थानबध्द शेख मुद्दसिर शेख जमील यांनी 30 जुलै पुर्वी

समक्ष उपस्थित राहण्याचे जिल्हादंडाधिकारी यांची उद्घोषणा यवतमाळ, दि 12 जुलै जिमाका :- शेख मुद्दासिर शेख जमील वय 23 वर्षे, रा. ताजपुरा वार्ड,उमरखेड, ता.उमरखेड जि. यवतमाळ याने “भारतीय दंड विधान” तसेच इतर कायद्यांचे कलमांअंतर्गत केलेल्या शिक्षापात्र अपराधाचे अनुषंगाने त्यांचे प्रवृत्तीत सुधारणा होण्याकरिता सादर करण्यात आलेल्या एम.पी.डी.ए.1981चे 3 (1) प्रमाणे सादर केलेल्या प्रस्तावावरुन त्यास स्थानबध्द करणे करीता दिनांक 17 जुन 2022 रोजी जिल्हादंडाधिकारी यवतमाळ यांनी स्थानबध्दतेचे आदेश पारित केले असता उक्त शेख मुद्दसिर शेख जमील सापडू शकत नाही असे प्रतिवेदन ठाणेदार पो.स्टे.उमरखेड यांचेकडून देण्यात आले आहे. तरी शेख मुद्दसिर शेख जमील वय हा फरार झालेला आहे किंवा सदर स्थानबध्दता आदेश बजावणी चुकवण्यासाठी तो गुप्तपणे वावरत असल्याची खात्री पटवण्यात आली असल्याने त्यांनी प्रस्तावीत स्थानबध्दास जबाब देण्यासाठी दिनांक 30 जुलै 2022 रोजी किंवा तत्पुर्वी जिल्हादंडाधिकारी कार्यालय,यवतमाळ येथे उपस्थित होण्याची उद्घोषणा जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अमोल येडगे यांनी निर्गमित केली आहे. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी