गेल्या 24 तासात 33 पॉझिटिव्ह ; 14 कोरोनामुक्त

यवतमाळ, दि 22 जुलै जिमाका :- गेल्या 24 तासात यवतमाळ जिल्ह्यात 33 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले तर 14 जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 82 व बाहेर जिल्ह्यात 6 अशी एकूण 88 झाली आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 620 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 33 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 587 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 79427 आहे. तर आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या 77536 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1803 मृत्यूची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 91 हजार 945 चाचण्या झाल्या असून त्यापैकी आठ लाख 12 हजार 518 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 8.90 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 5.32 आहे तर मृत्यूदर 2.27 आहे. आज पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये बाभुळगाव तालुक्यातील एक, दारव्हा सात, घाटंजी एक, पुसद एक, राळेगाव पाच, उमरखेड एक, यवतमाळ 16 व इतर जिल्ह्यातील एक रूग्ण असून त्यात 13 महिला व 20 पुरूषांचा समावेश आहे. नागरिकांनी कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचा पहिला, दुसरा व तीसरा डोज घेवून संपुर्ण लसीकरण करावे व स्वत:ला सुरक्षीत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी