मुद्रांक शुल्काचे दंडाबाबत सवलत योजना 31 जुलैपर्यंत दंड भरल्यास 90% सूट

यवतमाळ दि. 26 जुलै जिमाका :- दिनांक 1 एप्रिल 2022 पासून सुरू झालेल्या नोंदणी व मुद्रांक शुल्क दंड सवलत योजनेमधील पहिला टप्पा 31 जुलै 2022 रोजी संपत आहे. थकीत मुद्रांक शुल्क व शास्ती यासंबंधी पक्षकारांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हयाचे सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी यांचेकार्यालयाशी संपर्क साधावा व दंड सवलत योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन राज्याचे नोंदणीमहानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी केले आहे दि.31 मार्च 2022 पूर्वी नोंटीस प्राप्त झालेल्या पक्षकारांनी अद्याप या योजनेचा फायदा घेतला नसेल तर त्या संबंधीत पक्षकारांनी योजनेचा लाभ घ्यावा. संबंधित पक्षकारांनी दि.31 जुलै 2022 रोजीपर्यंत मुद्रांक शुल्क दंड सवलत योजनेचा लाभ घेतल्यास सदर सवलतीच्या पहिल्या टप्प्याचा म्हणजे थकित शास्तीवरील 90 टक्के सवलतीचा लाभ मिळेल. अन्यथा सदर पक्षकारांना दुसऱ्या टप्प्यातील शर्तीप्रमाणे थकित शास्तीवर 50 टक्के दंडभरावा लागेल. या योजनेचे संक्षिप्त स्वरूप असे आहे. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम 31,32(अ), 33, 33(अ), 46, 53(अ) अन्वये मुद्रांक शुल्क शास्तीच्यासंदर्भात दिनांक 31 मार्च 2022 रोजी किंवा त्यापूर्वी नोटीस प्राप्त झालेल्या पक्षकाराकरिता सदर माफी योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे.सदर योजना ही दि.1 एप्रिल 2022 ते30 नोव्हेंबर 2022 पर्यंत 8 महिने कार्यान्वित राहाणार आहे.सदर माफी योजना ही मुद्रांकशुल्काच्या तुटीच्या भागावर देय शस्तीच्या सवलतीसाठी जाहीर करण्यात आली आहे.1 एप्रिल 2022 ते 31 जुलै 2022 या कालावधीत मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम भरल्यास अथवा मुद्रांकशुल्क यापूर्वीच भरले असल्यास दंडाची रक्कम भरल्यास,दंडाच्या रकमेत 90 टक्के सुट मिळेल. तर 1 ऑगस्ट 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम भरल्यास,दंडाच्यारकमेत 50टक्के सुट मिळेल.योजनेबाबतअधिक माहिती नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.याबाबत कोणतीही अडचण असल्यास जिल्ह्यायाचे सहजिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी अथवा विभागाचे कॉल सेंटर वर 8888007777 व ईमेलआयडी complaintatigrmaharashtra.gov.in यावर संपर्क साधावा असे आवाहन सह जिल्हा निबंधक व्ही.डी.कळंबे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी